मुंबई : दिवाळीनिमित्त आमिर खान आणि क्रिकेटर विराट कोहलीसोबत एका खास चॅट शो आयोजन करण्यात आले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या शो मध्ये दोघांनीही खूप धमालमस्ती केली. बॉलिवूडच्या गाण्यावर विराटनेही ताल धरला. 


गाणी, गप्पा यामधून आमिर आणि विराटने त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही खास गोष्टींचाही उलगडा केला. अनुष्काचे कौतुक करताना नकळत तो तिला 'नुष्की' म्हणतो हे देखील सांगुन गेला. पण त्यासोबतच अनुष्का त्याला कोणत्या लाडाच्या नावाने हाक मारते हेदेखील सांगितले. 


अनुष्का विराटला 'चिकू' म्हणते. खरंतर क्रिकेटच्या मैदानावर धोनीने विराटला 'चिकू' अशी हाक मारली होती. हा आवाज स्टम्पच्या माईकमध्ये रेकॉर्ड  झाला होता. हे ऐकूनच अनुष्का विराटला आता 'चिकू' या नावाने हाक मारते. 


विराट आणि अनुष्का हे दोघंही सध्या त्यांच्या करिअरच्या प्रेमामध्ये आहेत. मीडियामध्ये त्यांच्या रिलेशनशीपबाबत फार खुलेपणाने बोलत नाहीत. मात्र या चॅट शोमधून मात्र पहिल्यांदाच अनेक खास गोष्टी त्यांच्या फॅन्ससमोर आल्या आहेत.