अनुष्का शर्मा विकतेय तिचे ऑनलाईन कपडे, पहा अनुष्काचे स्वस्तात मस्त कपडे
जर तुम्ही अनुष्काच्या फॅशन सेन्सचे फॅन असाल तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा बर्याचदा सोशल मीडियावर आपल्या आयुष्याशी संबंधित माहिती सोशल मिडियावर देत असते. जर तुम्ही अनुष्काच्या फॅशन सेन्सचे फॅन असाल तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. आता तुम्हाला तिच्या वॉर्डरोबमधून तिचे मॅटरनिटी कपडे विकत घेण्याची ही एक उत्तम संधी आहे. आता तुम्ही म्हणाल ते कसं शक्य आहे. होय, हे खरंय आता तुम्ही अनुष्काचे मॅटरनिटी कपडे विकत घेवु शकता
अनुष्काच्या कपड्यांचा लिलाव
अनुष्का शर्माने नुकतीच इन्स्टाग्रामवर माहिती दिली की, ती गरोदरपणात परिधान केलेले आपले मॅटरनिटी कपडे विकत आहे. या कपड्यांची किंमत 850 ते 9500 रुपयांपर्यंत आहे. अनुष्काच्या काही कपड्यांवर भारी सूट देखील देण्यात आली आहे.
बरेच ड्रेस आऊट ऑफ स्टॉक
अनुष्काचे मॅटरनिटी कपडे सॉल्ट स्काऊट वेबसाइटवर येताच हे कपडे आऊट ऑफ स्टॉक झाले. आपण बोली लावण्यासाठी फक्त काही कपडे शिल्लक आहेत. अनुष्काने हे केलं आहे जेणेकरुन ती मातांचं मानसिक आरोग्य सुधारण्यात काही योगदान देऊ शकेल.
वाचू शकतं 2.5 लाख लीटर पाणी
अनुष्का शर्मा मॅटरनिटी कपडे विकण्यासाठी मिळालेल्या पैशांचा उपयोग स्नेहा ही स्वयंसेवी संस्था प्रसूती संरक्षण तसंच पर्यावरण संरक्षणासाठी वापरणार आहे. अनुष्काच्या शेअर तुकड्यातून 2.5 लाख लिटर पाण्याची बचत होईल. अशी कल्पना अनुष्काला तिच्या गर्भधारणेदरम्यानच आली.
अनुष्काचा फन फॅक्ट
अनुष्का शर्माने व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की, 'समजा, जर भारतातील शहरांमध्ये राहणारी 1% गर्भवती स्त्रिया पुन्हा हे प्रसूती कपडे विकत घेत असतील तर आपण इतकं पाणी वाचवू शकतो की माणूस 200 वर्षे पिऊ शकेल.' हा एक मार्ग आहे ज्याद्वारे प्रत्येक माणूस मोठा बदल घडवून आणू शकतो.