Anushka Sharma Gudi Padwa Special : काल 22 मार्च रोजी हिंदू नवीन वर्ष आणि गुढीपाडवा होता. संपूर्ण महाराष्ट्रात तर अनेक ठिकाणी शोभायात्र काढण्यात आल्या होत्या. शोभायात्रेत तरुण मुलं तर गर्दी करतात. इतकंच काय तर प्रत्येक मराठमोळ्या घरी ही पुरण पोळीचं जेवण असतं. प्रत्येक व्यक्ती गुढीपाडव्याच्या दिवशी त्यांच्या घरात बनवलेल्या या जेवणाचा नक्कीच फोटो शेअर करताना दिसतात. यात फक्त तरुणाई नाही तर सेलिब्रिटी देखील आहेत. सेलिब्रिटी देखील हे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मानं (Anushka Sharma) देखील गुढीपाडवा कसा साजरा केला त्याचा फोटो शेअर केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनुष्कानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत पुरण पोळी, बटाट्याची भाजी, भात, आमटी, लोणचं असं जेवण असून ते केळ्याच्या पानावर वाढल्याचे दिसत आहे. हा जेवणाचा फोटो शेअक करत 'महाराष्ट्रीय पदार्थ बनवण्याचा माझ्या आईचा पहिला प्रयत्न. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.' दरम्यान, अनुष्कानं शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 



अनुष्काच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती लवकरच ‘चकदा एक्सप्रेस’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट माजी इंडियन क्रिकेटर झूलन गोस्वामीच्या आयुष्यावर आधारीत आहे. या चित्रपटाचं शूटिंग संपलं आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. आता चित्रपट कधी प्रदर्शित होणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रोसित रॉय यांनी केलं आहे. या चित्रपटात अनुष्कासोबत अभिनेत्री रेणुका शहाणे देखील दिसणार आहे. 


हेही वाचा : And The Oscar Goes too... खऱ्या मानकऱ्यांच्या हाती ऑस्करची चमचमणारी ट्रॉफी


दरम्यान, अनुष्काच्या खासगी आयुष्याविषयी बोलायचे झाले तर 2017 साली डिसेंबरमध्ये अनुष्कानं भारतीय क्रिकेटर विराट कोहलीशी लग्न केलं होतं. त्यानंतर 2021 साली अनुष्कानं मुलगी वामिकाला जन्म दिला. अनुष्का ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अनुष्का सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. अनुष्का तिच्या चाहत्यांना तिच्या आयुष्यातील गोष्टी झलक देताना दिसते. तर अनुष्कानं यशराजच्या 'रब ने बना दी जोडी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.