मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाशी अनेक चित्रपट अभिनेते-अभिनेत्री जोडलेले आहेत. त्या यादीत आता अभिनेत्री अनुष्का शर्माचे नाव देखील सामील झाले आहे. अशाप्रकारच्या चांगल्या कामाचा ती एक भाग असल्याने तिला अभिमान वाटत असल्याचे तिने ट्विटमध्ये म्हटले आहे. त्याचबरोबर तिने पंतप्रधान कार्यालयातून अभियानात सहभागी होण्यासाठी आलेली आमंत्रण पत्रिका देखील शेयर केली आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्विटमध्ये अनुष्काने लिहिले की, "स्वच्छ भारत अभियानाशी जोडले गेल्यामुळे मला सम्मानित झाल्यासारखे वाटत आहे आणि ‘स्वच्छता हीच सेवा’ हे सार्थ ठरवण्यासाठी मी माझे पूर्ण योगदान देईन." त्याचबरोबर तिने मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 


शुभेच्छा देताना तिने लिहिले की, "आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. स्वच्छता हीच सेवा या अभियानात सहभागी होण्यासाठी दिलेल्या आमंत्रणानिमित्त तुमचे आभार."