मुंबई : अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी आहे. बॉलिवूड असो किंवा क्रिकेट दोन्हीचे चाहते या दोघांना फॉलो करत असतात. नुकतेच दोघे भूतानला विराट कोहलीचा वाढदिवस साजरा करायला गेले होते. 5 नोव्हेंबरला विराट कोहलीचा वाढदिवस झाला. भूतानचे काही फोटो सोशल मीडियावर त्यांनी शेअर केले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वोग मॅगझिनच्या मुलाखतीत अनुष्काने आपल्या खासगी आयुष्याबद्दल अनेक गोष्टी शेअर केल्या. अनुष्काला विराटचे कपडे घालायला आवडतात याबाबत देखील ती या मुलाखतीत बोलली आहे. या फोटोंमध्ये आणि अगोदर देखील अनुष्काने विराट कोहलीचे कपडे घातल्याचं दिसत आहे.  



अनेकदा मी विराटच्या कपाटातील कपडे काढून घेते. जास्तकरून टी शर्ट आणि इतर गोष्टी, त्याचे जॅकेट काढून घेते. विराटला मी त्याचे कपडे घालणं अधिक पसंत आहे. त्यामुळे मी अनेकदा विराटचे कपडे घातले. तसेच अनुष्काने पुढे सांगितलं की, मला गुलाबी रंग आवडत नाही आणि मला ट्रेंड देखील फॉलो करायला आवडत नाही. लग्नातील सगळ्यांना आवडलेला गुलाबी रंगाचा लेहंगा माझ्या पसंतीचा नव्हता. 



नुकताच विराटने आपला 31 वा वाढदिवस भूतानमध्ये सादरा केला आहे. अनुष्का शर्माने तिकडचे फोटो शेअर करून विराटला आपल्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने फोटो शेअर करताना म्हटलं आहे की,'हा माझ्यासाठी एक आशिर्वादच आहे. माझा मित्र, माझा विश्वासपात्र, माझं खरं प्रेम... कायम तुझ्या मार्गावर यश मिळो. तुझी करूणाच तुला उत्तम लीडर बनवत आहे. मी प्रार्थना करते की, या गोष्टी तुला भरपूर मिळोत. हॅप्पी बर्थ डे माय लव.'