Anushka Sharma : आम्ही पाहिलेल्या सुंदर मुलींपैकी तू एक नाहीस... असं तुम्हाला जर कोणी म्हटलं तर तुमची काय प्रतिक्रिया असेल?  असं आपल्याला कोणी सरळ शब्दात सांगत नाही पण कधी ना कधी कोणी तरी हे कळत न कळत बोलून जातं आणि याची आपल्यावर एक वेगळीच छाप राहते... असाच प्रकार काहीसा बॉलिवूड अभिनेत्रीसोबत झाला आहे. ती अभिनेत्री म्हणजे अनुष्का शर्मा. (Anushka Sharma) अनुष्का शर्मा ही भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीची (Virat Kohli) पत्नी असली तरी देखील ती त्याच्यावर अवलंबून नसून ती देखील तिच्या करिअरमध्ये पीकवर आहे. (Virat Kohli's Wife) बऱ्याच वेळा अनुष्काला तर विराटच्या वाईट खेळीसाठी ट्रोल केलं जातं. मग अनुष्काच्या फ्लॉप चित्रपटासाठी कधी कोणी विराटला जबाबदार ठरवलं का? प्रत्येक व्यक्ती हा त्याच्या आयुष्यात स्वत: चं स्ट्रगल करत असतो. आज 8 मार्च रोजी जागतिक महिला दिना निमित्तानं आपण अनुष्काची Struggle Story जाणून घेणार आहोत. (Anushka Sharma's Struggle Story) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका आर्मी कुटुंबातून असताना अनुष्कानं कसं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. इतकंच काय तर रिजेक्शनवर रिजेक्शन ते 'आम्ही पाहिलेल्या सुंदर मुलींपैकी तू एक नाहीस' हे वक्तव्य... आणि मातृत्वची जाणीव... अनुष्का विषयी अशा अनेक गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत. 



'रब ने बना दी जोडी' या चित्रपटात अनुष्कानं बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खानसोबत (Shah Rukh Khan) मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. पण तरी देखील तिला पाहिजे तितकी लोकप्रियता मिळाली नाही. अनुष्काचा 'बॅंड बाजा बारात' (Band Baja Barat) हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी कोणी तिची मुलाखत देखील घेत नव्हते. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर लोक तिला ओळखू लागले. या चित्रपटानंतर तिला अनेकांनी सल्ले दिले की तू अशा चित्रपटांमध्ये काम कर जे 100 कोटींचा गल्ला करतील किंवा मग या ठरावीक अभिनेत्यासोबत काम कर. मात्र, अनुष्कानं असं काही केलं नाही. तिला असे चित्रपट करायचे होते जे पाहिल्यानंतर तिला अभिमान वाटेल. तिनं 7 वर्षांच्या करिअरमध्ये 6 चित्रपट केले आणि त्यानंतर तिनं बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये जागा मिळवली.  


स्त्री यांविषयी असलेला सन्मान कसा वाढला या विषयी अनुष्कानं Bazaar या मॅग्झीनला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं. एका Working -Mother ला तिच्या कामात आणि खासगी आयुष्यात बॅलेन्स आणण्यासाठी किती मेहनत करावी लागते हे कोणालाही माहित नाही. या सगळ्यासाठी पितृसत्ताक समाज जबाबदार आहे. मी एक स्त्री आहे आणि याची जाणीव मला आई होईपर्यंत झालीच नव्हती. आज मला महिलांबद्दल माझ्या मनात खूप जास्त आदर आणि प्रेम आहे. मी नेहमीच महिलांसाठी बोलत आले, पण त्यांच्यासाठी असलेले प्रेम आणि आदर हा त्या अनुभवानंच येतो आणि त्यानंतर आपण अजून शक्तिशाली बनतो."



अनुष्कानं ही अभिनेत्री असण्यासोबत तिच्या स्पष्ट विचारांसाठी देखील ओळखली जाते. आज अनुष्का फक्त एक अभिनेत्रीच नाही तर त्यासोबत निर्माती देखील आहे.