मुंबई : बॉलिवूड अभिनेता वरुण धवनचा आज ३१ वा वाढदिवस आहे. २०१० मध्ये जोहरच्या स्टुडेंट ऑफ द ईअर या सिनेमातून त्याने बॉलिवूडमध्ये पर्दापण केले. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. यानंतर वरुणने ११ सिनेात काम केले. त्याची खासियत म्हणजे त्यातील एकही सिनेमा फ्लॉप ठरला नाही. वाढदिवसानिमित्त सेलिब्रेटींनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. तर अनुष्का शर्माने एक खास ट्वीट करत वरुणला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.


पहा अनुष्काने दिलेले गिफ्ट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वरुण-अनुष्काचा सुईधागा हा नवा सिनेमा येऊ घातला आहे. या सिनेमातील एक फोटो शेअर करत अनुष्काने वरुणला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोत अनुष्का-वरुण एका बसमध्ये हसत उभे आहेत. दोघेही अत्यंत साध्या सिंपल लूकमध्ये दिसत आहेत. या ट्वीटमध्ये अनुष्काने लिहिले की, वरुण धवनला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तू आसपास असताना मी आनंदी वाटते आणि तुझ्यासोबत काम करणे नेहमी आनंद देते. हॅप्पी बर्थडे सर्वांचा प्यारे मौजी.



अनुष्का व्यतिरिक्त हृतिक रोशन, जॉन अब्राईम, राजकुमार राव, हुमा कुरेशी यांनी वरुणला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.







सध्या वरुण त्याच्या कलंक सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यात आलिया भट्ट प्रमुख भूमिकेत आहे. याशिवाय सिनेमात माधुरी दीक्षित आणि संजय दत्त ही जोडी खूप वर्षांनी एकत्र झळकणार आहे.