मुंबई : एक सामान्य स्त्री असो की सेलिब्रेटी, आई झाल्यानंतर तिला बर्‍याचदा समस्यांचा सामना करावा लागतो. बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने नुकतंच सांगितलं की, तिला केशरोगाचा त्रास होत आहे मात्र आता तिने असं काही केलं आहे, ज्यामुळे ती खूप खुश झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

थँक्यू सोनम
आई झाल्यावर अनुष्का शर्माला केशरोगाच्या समस्येचा सामना करावा लागला. यानंतर, तिने तिचे केस कापले आहेत. तिने आपल्या नवीन हेअरस्टाईल मधला एक गोंडस सेल्फी देखील पोस्ट केला आहे. हेयर स्टाईलिस्ट सोबत जोडल्याबद्दल सोनम कपूरचे अनुष्का शर्माने आभार मानत पोस्ट शेअर करत थँक्यू म्हटलं आहे. 



जानेवारीत अनुष्का शर्माने मुलगी वामिकाला जन्म दिला. प्रसुतिनंतर ती केस गळण्याच्या समस्येवर झगडत होती. मात्र आता तिने केस कापले आहेत. अनुष्का तिच्या नवीन हेअरस्टाईलमुळे खूप खुश आहे. तिने लिहिलं आहे की, जेव्हा बाळाचा जन्म झाल्यानंतर, केस गळण्यामुळे, आपण चांगले केस कापण्याचे अधिक कौतुक करायला सुरवात करतो. अनुष्काने हेअरस्टाईलस्टचे वर्णन शानदार केले आहे. सोनम कपूरशी संपर्क साधल्याबद्दल तिचेही आभारही मानले.


अनुष्का पति विराटसोबत इंग्लंडमध्ये आहे
अनुष्का शर्मा आजकाल विराट कोहलीसोबत इंग्लंडमध्ये राहत आहे. यादरम्यान, ती बरेच फोटोशूट करत आहे. दरम्यान, तिचे बरीच फोटो समोर आले आहेत. जेव्हा अनुष्का आणि विराट टूरला गेले होते तेव्हा एअरपोर्टवरचे या तिघांचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. दोघांनीही पापाराझींना विनंती केली आहे की, त्यांच्या मुलीच्या बातम्या देऊ नये. हे दोघंही आपल्या मुलीला माध्यमांपासून दूर ठेवू इच्छिते असं अनुष्काने प्रसूतीपूर्वी सांगितलं आहे.