मुंबई : अभिनेत्री सोनम कपूर आज  तिचा बॉयफ्रेंड आनंद अहुजासोबत विवाहबंधनात अडकली. मुंबईत पार पडलेल्या या लग्न सोहळ्यानंतर संध्याकाळी ग्रॅन्ड रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आहे. 


 कपूर कुटुंबीयांसोबत बॉलिवूडची हजेरी  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोनम कपूर आणि आनंद अहुजाला शुभेच्छा देण्यासाठी कपूर कुटुंबीयांसोबतच बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. वरूण धवन, जॅकलीन फर्नांडिस, बच्चन कुटुंबीय, करीना कपूर, करिष्मा कपूर यांसह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. मात्र काही सेलिब्रिटी सोनमच्या लग्नामध्ये सहभागी नव्हते. यामधील एक नाव म्हणजे अनुष्का शर्मा.  


अनुष्का शर्माने दिल्या ट्विटरवर शुभेच्छा ! 


अनुष्का शर्मा तिच्या ' झिरो' या चित्रपटाच्या शूटिंगसाठी अमेरिकेमध्ये आहे. यामुळे अनुष्का सोनमच्या लग्नामध्ये सहभागी झाली नव्हती. दरम्यान अनुष्काने सोनमला ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. 


 



 


आनंद सोबत सोनम अडकली विवाहबंधनात 


सोनम 32 वर्षीय आनंद अहुजासोबत विवाहबंधनात अडकली आहे. आनंद अहुजा हा दिल्लीत एक प्रसिद्ध उद्योगपती आहे. अनेक वर्ष आनंद आणि सोनम रिलेशनशिपमध्ये होते. दोघांच्या कॉमन फ्रेंडच्या मदतीने त्यांची ओळख  झाली.