मुंबई : अभिनेत्री अनुष्का शर्माचा भाऊ करनेश शर्मा 'बुलबुल' फेम अभिनेत्री तृप्ती डिमरीला डेट करत असल्याची चर्चा रंगत आहे. त्यांच्यातील घट्ट मैत्रीचे  किस्से आता सर्वत्र तुफान व्हायरल होत आहेत. शिवाय तृप्ती आणि करनेश एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा देखील रंगल्या आहेत. सुत्रांना दिलेल्या माहितीनुसार तृप्ती आणि करनेश यांची भेट 'बुलबुल' चित्रपटाच्या सेटवर झाली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'बुलबुल' चित्रपटाची निर्मिती अनुष्का शर्मा आणि तिचा भाऊ करनेश शर्मा यांनी मिळून केली. चित्रपटामध्ये तृप्तीसोबत अभिनेता अविनाश तिवारी आणि राहुल बोसने मुख्य भूमिका साकारली होती.  काही दिवसांपूर्वी अनुष्काने तृप्ती आणि करनेशचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. 



अनुष्का शर्माला देखील तृप्ती फार आवडते. अनुष्काच्या पोस्टवरून सिद्ध होतं की तृप्तीसोबत तिचे संबंध चांगले आहेत. तृप्तीबद्दल सांगायचं झालं तर तृप्तीने 2017साली प्रदर्शित झालेल्या 'पोस्टर बॉयज' चित्रपटाच्या माध्यमातून रूपेरी पडद्यावर एन्ट्री केली. पण तृप्तीला लोकप्रियता 'बुलबुल' चित्रपटाच्या माध्यमातून मिळाली. 


आता तृप्ती अनुष्का शर्माच्या प्रॉडक्शन हाऊस अंतर्गत तयार होत असलेल्या आगामी चित्रपटात देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'Qala'असं चित्रपटाचं नाव असून दिवंगत अभिनेते इरफान खान यांचा मुलगा बाबिल या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.