अंगावर शहारे आणणारा `परी`चा नवा टीझर प्रदर्शित...
अनुष्का शर्माच्या प्रॉडक्शन हाऊसचा चित्रपट `परी`चा एक नवा टीझर प्रदर्शित झाला आहे.
नवी दिल्ली : अनुष्का शर्माच्या प्रॉडक्शन हाऊसचा चित्रपट 'परी'चा एक नवा टीझर प्रदर्शित झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून अनुष्काच्या या चित्रपटाचे टीझर समोर येत आहेत. मात्र हा टीझर काहीसा भीतीदायक आहे.
अत्यंत भीतीदायक
परी या चित्रपटात बंगाली अभिनेता परमब्रत चटर्जी झळकणार आहे. या चित्रपटाचे शूटींग मुंबई आणि कोलकत्ता येथे झाले आहे. टीझर आणि पोस्टरमध्ये अनुष्काचा लूक अंगावर काटा आणणारा आहे. पहा परीचा हा नवा टीझर...
अनुष्काच्या प्रॉडक्शन हाऊसचा चित्रपट
अनुष्का शर्मा प्रॉडक्शन हाऊस क्लीन स्लेट फिल्म्सचा हा तिसरा चित्रपट आहे. सुरूवातीला हा चित्रपट २ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार होता. मात्र आता रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. २ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होईल. यापूर्वी प्रॉडक्शन हाऊसमधून तिने 'NH 10' आणि 'फिल्लोरी' या चित्रपटांची निर्मिती केली होती.