अनुष्का रूग्णालयाबाहेर, अफवांना जोर
अनुष्काला रूग्णालयाबाहेर स्पॉट केल्यामुळे रंगणाऱ्या चर्चांना वेगळे वळण लागले आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारताचा क्रिकेट कर्णधार विराट कोहली या जोडप्याचे फोटो पाहून 'कपल गोल्स'ची चर्चा नेहमीच रंगत असते. आपापल्या व्यस्त जीवनातून हे कपल एकमेकांना वेळ देताना दिसतात... तर त्यांच्याबद्दल रंगणाऱ्या चर्चांना नवीन पालवी फुटल्याचे चित्र समोर येत आहे. नुकतंच अनुष्का शर्मा हिला मीडिया कॅमेऱ्यांनी रुग्णालयाबाहेर स्पॉट केलं. त्यामुळे अनुष्काबद्दल वेगवेगळ्या चर्चांणा उधाण आलंय. काही मीडिया रिपोर्टसनुसार, अनुष्का प्रेग्नंट आहे तर काही मीडियानं मात्र अनुष्का गंभीर आजारी असल्याचा दावा केलाय.
यामुळेच, अनुष्का गरोदर असल्याच्या चर्चा जोर धरत आहेत. पण या गोड बातमीवर विरूष्काने मात्र मौन बाळगले आहे. याबद्दल कोणत्याही प्रकारची आधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. डॉक्टरांनीही याबद्दल भाष्य करण्यास नकार दिला आहे. तर आता विराट आणि अनुष्का कधी ही गोड बातमी खरी असली तर ते आपल्या चाहत्यांसोबत कधी शेअर करतात, हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
परंतु, दुसरीकडे मात्र काही मीडिया रिपोर्ट्सने दिलेल्या माहितीनुसार, अनुष्का एका गंभीर आजाराने त्रस्त आहे. अनुष्का 'बल्जिंग डिस्क' या गंभीर आजारानं त्रस्त असल्याचं सांगण्यात येतंय. या आजारामध्ये कमरेतील हाडांना वेदना होतात. हा आजार फार काळ पाठ सोडत नाही. दुसऱ्यांदा अनुष्का या आजाराची शिकार झाली आहे.
'विरुष्का' ही सर्वाधिक चर्चेत असलेली ही जोडी २०१७ साली लग्न बंधनात अडकली. त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अनुष्का आणि विराटला कधी हॉटेलच्या बाहेर तर कधी क्रिकेटच्या मैदानावर स्पॉट करण्यात आले आहे. पण आता अनुष्काला रूग्णालयाबाहेर स्पॉट केल्यामुळे रंगणाऱ्या चर्चांना वेगळे वळण लागले आहे.