मुंबई : लग्नसमारंभ म्हटलं की राग - रुसवे हे आलेच. आणि


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संपूर्ण जगाचं लक्ष ज्या लग्नाकडे लागून राहिले होतं ते म्हणजे विरूष्काचं लग्न. गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेलं हे लग्न अखेर ११ डिसेंबर २०१८ रोजी इटलीत पार पडलं आहे. या समारंभाचे अनेक फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण मगाशी म्हटल्याप्रमाणे लग्नसमारंभ म्हटलं की तिथे मानापमान हे आलंच. असंच काहीस विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या लग्नात देखील घडलं आहे. या रुसव्या - फुगव्यांपासून विरूष्काचं लग्न देखील सुटलेलं नाही. 


कुणामध्ये झाला हा वाद? 



पण ही भांडणं शर्मा - कोहली या दोन कुटुंबात झालं नसून हा वाद झालाय फोटोग्राफर आणि डिझाइनरमध्ये.  विराट- अनुष्काचे डिझायनर सब्यसाची मुखर्जी आणि फोटोग्राफर जोसेफ राधिक होते. आणि या दोघांमध्येच सोशल मीडियावर बाचाबाची झाली आहे. झालं असं की, लग्नानंतर सब्यसाचीने तयार केलेले डिझाइन लोकांना दाखवण्यासाठी अनुष्का- विराटचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. पण हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताना फोटोग्राफरला साधे क्रेडिटही सब्यसाचीला द्यावेसे वाटले नाही याचा जोसफला राग आला. आणि त्याने त्या पद्धतीने तो व्यक्त देखील केला. 



याचाच राग व्यक्त करताना जोसफने विराट- अनुष्काच्या साखरपुड्याचा फोटो शेअर करत म्हटले की, अनुष्काला तिच्या लग्नाचे प्रत्येक फोटो पोट्रेट फ्रेममध्ये हवे होते. तिच्या अनेक फोटोंपैकीच हा एक फोटो आहे. पण सब्यसाचीच्या टीमने त्यांचे काम दाखवण्यासाठी हा फोटो वापरला आणि मला क्रेडिटही देणे गरजेचे समजले नाही याचे मला दुःख आहे.