अभिनेत्रीचा स्वत: ला संपवण्याआधी आईला व्हिडीओ कॉल, पतीविषयी धक्कादायक खुलासा
Aparna Nair suicide : अपर्णा नायरनं 31 ऑगस्ट रोजी स्वत: ला संपवलं. त्यानंतर तिच्या आईनं आता लेकीच्या निधनासाठी जावयाला जबाबदार ठरवले आहे.
Aparna Nair suicide : लोकप्रिय मल्याळम अभिनेत्री अपर्णा नायरचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. अपर्णा ही तिरुवनंतपुरम येथे राहायची तर 31 ऑगस्ट रोजी संध्याकाळी तिचं निधन झालं. राहत्या घरी अपर्णाचा अनैसर्गिक मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी अनेकांचा जवाब नोंदवले आण त्यानंतर या प्रकरणाच तपास केला. आता या प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे की तिची आई बीना यांनी जावयावर लेकीच्या मृत्यूचे गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी अपर्णाचे पती संजीत यांच्यावर आत्महत्या करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा दावा केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की संजीतनं त्यांच्या लेकीचा मानसिक छळ केला. याच कारणामुळे त्यांच्या लेकीचे निधन झाले.
अपर्णाच्या आईनं पुढे सांगितलं की मी लगेच संजीवला फोन केला की तू याविषयी माहिती काढ की अपर्णा सुरक्षित आहे की नाही. मी त्याला म्हटलं की दरवाजा तोडून आत जा आणि तिला चुकिचं पाऊल उचलण्यापासून थांबव. पण त्यानं माझं ऐकलं नाही. बीना पुढे म्हणाल्या की 'संजीत अर्ध्या तासानंतर अपर्णाच्या रूममध्ये गेला, पण तो पर्यंत तिचे निधन झाले होते.' बीना यांनी पुढे सांगितलं की 'त्यांच्याशी फोनवर बोलल्याच्या दुसऱ्या क्षणी जर तिच्या रुममध्ये गेला असता तर अपर्णाचे निधन झाले नसते.' अपर्णाची आई पुढे म्हणाली की 'त्या दोघांचं वैवाहिक आयुष्य ठीक नव्हतं. त्यांच्यात वाद होते.'
Karamana इंस्पेक्टर पीएस सुजीत यांनी सांगितलं की 'लवकरच बीना यांचा जबाव नोंदण्यात येणार आहे. त्ंयाच्या जबावात तथ्य असेल तर लगेच संजीत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार.'
हेही वाचा : विकी कौशलच्या वडिलांचा सेटवर अपमान करत हकलवून लावले तेव्हा...
अपर्णाविषयी बोलायचे झाले तर तिनं लोकप्रिय मालिका 'मेगाथीर्थम', 'मुधुगौव', 'अचयन्स', 'कोडथी समक्षम बालन वकील', 'कल्कि', 'चंदनमाझा' आणि 'आत्मसखी' अशा लोकप्रिय मालिकांमधून कामं केली आहेत. अपर्णा या सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतात. तर अपर्णा आणि संजीत यांना दोन मुली असून त्यांची नावं थ्रया नायर आणि कृतिका नायरही आहेत. अपर्णा यांच्या अकालिन मृत्यूनं अभिनय क्षेत्रापासून तिच्या घरच्यांवर शोककळा पसरली आहे.