श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या प्रमुख भूमिका असलेला स्त्री-2 हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजतोय. आत्तापर्यंत या सिनेमाने 500 कोटींपर्यंतचा गल्ला जमवला आहे. 11 दिवसांतच सिनेमाने  रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. मात्र आता या चित्रपटाला मिळालेल्या यशाच्या श्रेय एकट्या श्रद्धा कपूरला देण्यात आल्यामुळं इतर सहकलाकारांमध्ये दुफळी निर्माण झाल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. श्रद्धा कपूरला संपूर्ण चित्रपटाचं क्रेडिट देण्यात आलं आहे. त्यावरुन इतर सहकलाकार नाराज असल्याचं बोललं जात आहे. आता यावर अभिनेता अपारशक्ती खुराना यांने मौन सोडलं आहे. तसंच, त्याच्या वक्तव्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अपारशक्ती खुरानाने झुमला दिलेल्या एका मुलाखतीत स्त्री -2 चं सगळं क्रेडिट श्रद्धा कपूरला देण्यात आलं आहे यावरुन प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्याने सूचक वक्तव्य करत म्हटलं आहे की, मी यावर काहीच बोलणार नाही. एकदा  चर्चा सुरू झाली की त्यावरच दीर्घकाळ चर्चा होत होईल (बात खुलेगी तो दूर तक जाएगी). त्यामुळं मी यावर काही बोलणार नाही. प्रेक्षक जे म्हणतील ते योग्य असेल, असं अपारशक्ती खुरानेन म्हटलं आहे. तसंच, त्याने पुढे म्हटलं आहे की, हे सर्व पीआरवर अवलंबून असतं. कोणाला किती महत्त्व द्यायचं आणि कोणाला कमी, आपा आपारशक्तीचे हे वक्तव्य चांगलंच गाजतंय. यावरुन श्रद्धा कपूरला मिळणाऱ्या क्रेडिटवर अभिनेता नाराज असल्याचं म्हटलं जातं आहे. 


दरम्यान, स्त्रीमध्ये श्रद्धा कपूरची भूमिका खूपच लहान आहे. त्या तुलनेत राजकुमार राव आणि चित्रपटात दाखवले गेलेले त्याचे दोन मित्र बिट्टू म्हणजेच अपारशक्ती खुराना आणि जना अभिषेक बॅनर्जी यांच्या भूमिका महत्त्वाच्या आहेत.तिघांनाही श्रद्ध कपूरच्या तुलनेत अधिक स्क्रीन टाइम मिळाला आहे.मात्र सर्वाधिक चर्चा झालीये ती श्रद्धा कपूरची. त्यामुळं राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरच्या चाहत्यांमध्ये जोरदार जुंपली होती. आता यात अपारशक्ती खुरानाचीदेखील एन्ट्री झाली आहे. 


स्त्रीमधील जना म्हणतोय... 


स्त्रीच्या सक्सेसचं क्रेडिट कोणाला मिळावं यावरुन जो वाद रंगला आहे त्यावर आता अभिषेक बॅनर्जीनेदेखील वक्तव्य केलं आहे. अभिषेक म्हणतो की, 'मला पीआरबद्दल कळत नाही. मला सोशल मीडियावर होणाऱ्या चर्चादेखील कळत नाहीत. जेव्हा एखादा चित्रपट हिट होतो तेव्हा काही ना काही निगेटिव्ह समोर येतंच. मात्र त्यावर जास्त लक्ष न देणे हेच योग्य आहे. हा सर्वाचा चित्रपट आहे. हा चित्रपट अमर कौशिक यांचा आहे. तुम्ही किती वाद खाला ते सर्व निरर्थक आहे. दिग्दर्शकच जहाजाचा कॅप्टन असतो, त्याप्रमाणे हा चित्रपटही त्यांचा आहे.'