तरुणपणीच केस पांढरी झाली? चिमूटभर हळदीने होतील काळीभोर, वापरा नैसर्गिक उपाय

बदलत्या लाइफस्टाइलमुळे अनेकांना केसांच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. अनेक तरुणांची केस अवेळीच पांढरी झाल्याने सतत केस डाय करावी लागतात. बाजारात उपलब्ध असलेल्या डायमुळे केसांचे आरोग्य बिघडते आणि केस गळण्याची समस्या सुद्धा होते. तेव्हा तुम्हाला केस काळे करण्यावर असा घरगुती आणि नैसर्गिक उपाय सांगणार आहोत ज्यामुळे केस काळे होतील आणि केसांचे आरोग्य सुद्धा बिघडणार नाही. 

Sep 17, 2024, 19:48 PM IST
1/5

हळद ही प्रत्येक किचनमध्ये उपलब्ध असते. हळदीमध्ये एंटीऑक्‍सीडेंटची भरपूर मात्रा असून यात मिनरल्‍स आणि विटामिन सुद्धा आढळतात. हे व्हिटॅमिन्स केसांच्या आरोग्यासाठी उपयोगी ठरतात. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार जेव्हा केस हेल्दी असतात तेव्हा ते पांढरे होत नाहीत. अशाप्रकारे केस हेल्दी ठेवण्यासाठी तुम्ही हळदीचा वापर करू शकता. 

2/5

पहिला उपाय :

एका वाटीत एक अंड फोडून घ्या. मग त्यात दोन चमचे मध आणि दोन चमचे हळद मिसळा. आता याची पेस्ट बनवा मग अतिशय काळजीपूर्वक केसांवर लावा. ही पेस्ट केसांवर एक तास तशीच राहू द्यात. यानंतर केस सध्या पाण्याने धुवा. 

3/5

दुसरा उपाय :

तवा आणि गॅसवर ठेऊन गरम करा. तवा गरम झाल्यावर त्यात 4 ते  5 चमचे हळद टाका. आता ही हळद तोपर्यंत भाजा जोपर्यंत हळद काळी होत नाही. आता या काळ्या हळदीची पावडर नारळाच्या तेलात मिसळा आणि पेस्ट तयार करा. मग ही पेस्ट पांढऱ्या केसांवर लावा आणि अर्धातास तसंच राहू द्या. पेस्ट लावल्यावर तब्बल अर्ध्या तासाने केस धुवून टाका.   

4/5

तिसरा उपाय :

एका वाटीत 4 चमचे आवळा पावडर आणि 4 चमचे हळद पावडर मिक्स करा. आता यात मोहरीचं तेल टाकून केसांना लावा. एक तासांनी माईल्ड शॅम्पूने केस धुवून टाका. 

5/5

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. केसांवर कोणत्याही गोष्टीचा वापर करण्याआधी डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)