मुंबई : अभिनेता अपारशक्ती खुराना  (Aparshakti Khurana) आणि त्याची पत्नी आकृती अहुजा (Aakriti Ahuja) लेकीचे पालक झाले आहेत. याचा आनंद त्यांनी सगळ्यांसोबत शेअर केला. 27 ऑगस्ट 2021 रोजी अपारशक्ती आणि आकृती यांना गोंडस मुलगी झाली. यानंतर त्यांच्या लेकीची पहिली झलक पाहण्यासाठी सगळेच इत्सुक होते. आकृतीने चाहत्यांची ही इच्छा पूर्ण केली आहे. पाहुया लेकीची पहिली झलक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अपारशक्ती आणि आकृती यांनी लेकीच्या जन्मासोबतच तिचं नाव देखील जाहीर केलं. इंस्टाग्राम हँडलवरून एक छोटंस कार्ड शेअर केलं. त्यावर लिहिलं होतं,'आकृती आणि अपारशक्तीचं प्रेम आरजोई ए खुराना तुमचं स्वागत आहे.'



7 डिसेंबर 2021 रोजी अपारशक्ती आणि आकृती अहुजा यांच्या वैवाहिक जीवनाला सात वर्षे पूर्ण झाली. या दिवसाला अगदी यादगार करण्यासाठी आकृतीने आपल्या इंस्टाग्रामवर आरजोईचा फोटो शेअर केलाय. या फोटोत आरजोई बाबा अपारशक्तीसोबत शांत झोपलेली दिसत आहे. बाप-लेकीची ही जोडी सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत आहे.



फोटोसोबत आकृतीने लिहिले, "7 वर्षांच्या शांतता आणि मस्तीचा सारांश. #HappyAnniversary @aparshakti_khurana." त्याच वेळी, अपारशक्तीने आकृतीने शेअर केलेल्या या फोटोवर अनेक हार्ट इमोजी बनवून प्रतिक्रिया दिली आहे.


31 ऑगस्ट 2021 रोजी, अपारशक्ती खुरानाने आपल्या मुलीचा एक फोटो त्याच्या इन्स्टा हँडलसह शेअर केला. या फोटोमध्ये अपारशक्ती आणि आकृती त्यांच्या मुलीचे बोट धरताना दिसत आहेत. मात्र, फोटोमध्ये कोणाचाही चेहरा दिसत नाही. चित्रात, आकृती हातात 'विगो' धरताना दिसत आहे. हे शेअर करत अभिनेत्याने कॅप्शनमध्ये लिहिले, "हा जीवनाचा आनंदी प्रेम त्रिकोण आहे."



अपारशक्तीने बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आयुष्मानचा भाऊ म्हणून पदार्पण केले असेल, परंतु वर्षानुवर्षे त्याने मनोरंजन विश्वात स्वतःचे स्थान आणि ओळख निर्माण केली आहे. अपारशक्ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधीच आकृतीच्या प्रेमात पडला होता.