आपल्या सेक्स लाईफवर रणबीर कपूर व्यतिरिक्त या सेलिब्रिटींकडून धक्कादायक वक्तव्य
सेक्स लाइफ ही एक अशी गोष्ट आहे ज्याबद्दल सहसा बोलणं टाळलं जातं.
मुंबई : सेक्स लाइफ ही एक अशी गोष्ट आहे ज्याबद्दल सहसा बोलणं टाळलं जातं. पण असे अनेक सेलेब्स आहेत जे त्यांच्या सेक्स लाईफबद्दल खुलेपणानं बोलले आहे. यामध्ये रणवीर सिंगचाही समावेश आहे. आज आम्ही तुम्हाला अशा अभिनेते आणि अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत ज्यांनी त्यांच्या सेक्स लाईफबद्दल खुलेपणाने सांगितलं आहे.
रणवीर सिंग
रणवीर सिंगने एका मुलाखतीदरम्यान सांगितलं की, त्याने वयाच्या १२व्या वर्षी पहिल्यांदा सेक्स केला आहे. शाळेतील मित्रांच्या आई मित्रांना सांगायच्या की, रणवीर वाईट आहे तो आमच्या मुलांना बिघडवत आहे.
आलिया भट्ट
एका मुलाखतीदरम्यान, जेव्हा आलिया भट्टला तिच्या आवडत्या सेक्स पोझिशनबद्दल विचारण्यात आलं तेव्हा तिने सांगितलं की, तिला 'क्लासिक मिशनरी' आवडतं कारण ती खूप साधी व्यक्ती आहे.
रणबीर कपूर
एका संवादादरम्यान रणबीर कपूरने मोठा खुलासा केला आहे. वयाच्या १५ व्या वर्षी त्याने वर्जिनिटी गमावल्याचं त्याने सांगितलं होतं. रणबीर कपूर सहसा मीडियाशी बोलताना दिसत नाही. अशा परिस्थितीत त्याच्या या वक्तव्याने लोकांना धक्का बसला होता.
सुशांत सिंग राजपूत
सुशांत सिंग आज या जगात नाही, त्याचे चाहते आजही त्याची आठवण काढतात. एकदा जेव्हा सुशांतला त्याच्या आवडत्या सेक्स पोझिशनबद्दल विचारण्यात आलं तेव्हा त्याने सांगितलं की, त्याला 60s आवडते.
अर्जुन कपूर
अर्जुन कपूरनेही त्याच्या सेक्स लाईफबद्दल खुलासा केला आहे. सेक्स आणि फूडमध्ये त्याच्यासाठी काय महत्त्वाचं आहे, असं विचारल्यावर तो म्हणाला की मी सेक्सला प्रेमापेक्षा जास्त रेटिंग देतो.