मुंबई : अपेक्षा पोरवाल एक भारतीय मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिने मिस युनिव्हर्स आणि मिस इंडियासह अनेक सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. नुकतेच 68 व्या फिल्मफेअर पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले होते. अनेक दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत हा खास सोहळा पार पडला. राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर यांच्या ‘बधाई दो’ ने फिल्मफेअर मध्ये  अनेक पुरस्कार पटकावले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रपटातील कोमल, सुमीचे (भूमी पेडणेकर) पहिले प्रेम ही व्यक्तिरेखा साकारणारी अपेक्षा पोरवाल हिने संपूर्ण टीमचे अभिनंदन करून एक खास मेसेज शेअर केला.तिने 2021 मध्ये हॉटस्टार टेलिव्हिजन मालिका 'दिल बेचारा' आणि 2022 मध्ये प्रदर्शित होणारा बॉलिवूड चित्रपट 'बधाई दो' मध्ये सहाय्यक अभिनेता म्हणून काम केलं आहे.


अभिनेत्री म्हणते, " फिल्मफेअरमध्ये अनेक पुरस्कार मिळवल्याबद्दल टीम बधाई दोचे खूप खूप अभिनंदन. या चित्रपटाचा एक छोटासा भाग असल्याबद्दल मी खूप आभारी आहे, हा एक संदेश देऊन जाणारा चित्रपट आहे जो  LGBTQI ची एक सुंदर कथा मांडतो "


ती पुढे पुढे म्हणते, "समलिंगी विवाह विधेयकावर SC मध्ये सध्या सुरू असलेले खटले पाहता, मला आशा आहे की हा चित्रपट नक्कीच समीक्षकांना सोबत प्रेक्षकांना सुद्धा काहीतरी छान संदेश देऊन जातो. अपेक्षा पोरवाल सध्या स्लेव्ह मार्केट या इंग्रजी-अरबी वेब सीरिजचे नेतृत्व करणारी पहिली भारतीय म्हणून परदेशात चर्चेत आहे. ती सध्या स्लेव्ह मार्केटच्या पुढच्या सीझनवर आणि इतर अनेक प्रोजेक्ट्सवर बॅक टू बॅक काम करत आहे आणि प्रेक्षकांना लवकरच अपेक्षा कडून काहीतरी उत्तम बघायला मिळणार यात शंका नाही.


1900 च्या दशकातील सेट झालेल्या स्लेव्ह मार्केटमधील ती एका भारतीय राजकन्येची भूमिका साकरतेय. आणि विविध देशांतील कलाकार यात आहेत. शोची थीम गुलामगिरी, प्रेम आणि विविध संस्कृतींभोवती फिरते. हा शो आंतरराष्ट्रीय स्टार कास्टसह मध्य पूर्वमध्ये मोठ्या प्रमाणावर चित्रित केला गेला आहे. 


2020 मध्ये तिने आशिष आर.  शुक्ला दिग्दर्शित 'अनदेखी' या वेब टेलिव्हिजन सिरीजमध्ये अभिनेत्री म्हणून पदार्पण केलं आणि प्रसिद्धी मिळवली, ज्यामध्ये तिने कोयल नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती.