राखी सावंत आणि शर्लिन चोप्रामधील वाद टोकाला; व्हिडिओ समोर
`31 किलोचा मेकअप लावते, दर 4 महिन्याला बॉयफ्रेंड बदलते` शर्लिन चोप्राने घेतला राखीच्या अपमानाचा बदला
Sherlyn Chopra Rakhi Sawant Cat Fight : राखी सावंत बॉलीवूडची ड्रामा क्वीन असेल तर शर्लिन चोप्रा देखील कोणापेक्षा कमी नाही. कॅमेरा पाहिल्यावर, दोन्ही ड्रामा क्वीन खूप ड्रामा करतात. सध्या दोघांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झालं आहे. शर्लिनने साजिद खानविरोधात तक्रार दाखल केली तर राखी साजिदला तिचा भाऊ म्हणत तिच्या समर्थनात आली आहे. त्याचबरोबर MeToo आरोपी साजिदच्या अफेअरमध्ये राखी शर्लिनला खूप वाईट बोलली मग शर्लिनही राखीला सुनवण्यात मागे पडली नाही.
शर्लिनने राखीच्या नौटंकीचा मुद्दा उपस्थित केला
आज जेव्हा शर्लिन चोप्राला देखील पापाराझींनी स्पॉट केलं तेव्हा तिने देखील आगीत तेल ओतलं. एक दिवसापूर्वी राखीने शर्लिनवर केलेल्या आरोपांबद्दल पापाराझींनी शर्लिनला प्रश्न केला आणि तिच्याबद्दल वाईट बोलली. त्यानंतर अभिनेत्री भडकली आणि तिने राखीला बरंच काही सांगितलं. राखीने तिच्या ड्रामाचा मुद्दा उपस्थित केला आणि सांगितलं की, राखी जेव्हा स्वतः नौटंकी करते तेव्हा तिला काहीच दिसत नाही.
राखी 31 किलो मेकअप लावते
राखीबद्दल शर्लिन म्हणाली, '३१ किलो मेकअप, दर चौथ्या महिन्यात बॉयफ्रेंड आणि नवरा बदलते, टक्कल लपवण्यासाठी विंग वापरते.. आम्ही कधी विचारलंय का? तिला लाज वाटते.
राखीने साजिद खान निर्दोष असल्याचं सांगितलं
खरंतर राखी प्रत्येकवेळी साजिद खानला निर्दोष म्हणत असते. एक दिवस आधीही तिने मीडियासमोर ओरडून साजिदला निर्दोष आणि शर्लिनला दोषी ठरवलं होतं. ती म्हणाली की, साजिदला खोटं बोलून गोवलं जात आहे.
त्याच्याविरुद्ध कोणतेही पुरावे नाहीत, तर MeToo चळवळीदरम्यान साजिदवर सुमारे 9-10 मुलींचं शोषण केल्याचा आरोप होता. त्याचबरोबर, सोशल मीडिया युजर्सना शर्लिन आणि राखीमधली अशी भांडणं पाहून खूप मजा येत आहे. कारण राखीने तिच्याच स्टाईलमध्ये शर्लिनला इशारा देत चोख उत्तर देण्यास सांगितलं आहे.