AR Rahman यांच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी! लग्नाच्या 29 वर्षानंतर पत्नी सायरा म्हणाली, `हे खूप वेदनादायी...`
AR Rahman Divorce : एआर रहमान आणि सायरा यांचं नातं घटस्फोटावर आलंय. लग्नाच्या 29 वर्षांनंतर सायराने मोठी घोषणा केलीय.
AR Rahman Divorce News: ऑस्कर विजेते संगीतकार ए आर रहमान 29 वर्षांच्या लग्नानंतर पत्नी सायरा बानोपासून वेगळे होणार आहेत. रेहमान आणि सायराच्या वकिलाने एक जाहीर निवेदन जारी करून सांगितलं की, या जोडप्याने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. पत्नीच्या म्हणण्यानुसार, या नात्यात तिला खूप वेदना होत होत्या, जे सांभाळणे तिच्यासाठी खूप कठीण झालंय.
सायरा म्हणाली, 'हे खूप वेदनादायी...'
एआर रहमानच्या चाहत्यांसाठी ही बातमी धक्क्यापेक्षा कमी नाही. प्रेस रिलीजनुसार, जोडप्याचा विभक्त होण्याचा निर्णय हा अचानक घेतलेला निर्णय नाही. बराच वेळ विचार करून आणि समजून घेतल्यानंतर सायरा या निष्कर्षापर्यंत पोहोचली आहे. सायराने प्रेस रिलीजमध्ये म्हटलंय की, 'ती आता हे नातं वाचवू शकत नाही.'
प्रेस रिलीजमध्ये लिहिलंय की, 'लग्नाच्या अनेक वर्षानंतर सायरा यांनी त्यांचे पती ए.आर. रहमानपासून वेगळे होण्याचा कठीण निर्णय घेतला आहे. हा निर्णय त्यांच्या नातेसंबंधातील महत्त्वपूर्ण भावनिक तणावानंतर घेतला आहे. एकमेकांवर त्यांचं नितांत प्रेम असूनही, या जोडप्याला असं आढळून आलंय की तणाव आणि अडचणींमुळे त्यांच्यात एक दरी निर्माण झाली आहे जी यावेळी दोन्ही पक्षांनी भरून काढता आलेली नाही. सायरा यांनी वेदना आणि त्रासामुळे हा निर्णय घेतल्याचे आवर्जून सांगितलं. सायरा या आव्हानात्मक काळात लोकांकडून गोपनीयतेची आणि समजून घेण्याची विनंती करते, कारण ती तिच्या आयुष्यातील या कठीण अध्यायातून जात आहे. या जोडप्याला तीन मुलं आहेत.
एआर रहमान आणि सायरा यांचा विवाह 1995 मध्ये झाला होता. या जोडप्याला तीन मुलं असून त्यांची नावं खतिजा, रहीमा, आमेन अशी आहे. संगीतकाराने सांगितलं होते की हे नातं त्याच्या आईने ठरवले होतं. दोघांमध्ये बरेच सांस्कृतिक फरक होते पण तरीही ते आपलं नातं चांगले जपत होते. सिमी ग्रेवालला दिलेल्या मुलाखतीत रहमानने सांगितलं होतं की, खरं सांगायचं तर माझ्याकडे वधू शोधण्यासाठी वेळ नव्हता. पण, माझ्यासाठी लग्न करण्याची हीच योग्य वेळ आहे हे मला माहीत होतं. मी 29 वर्षांचा होतो आणि मी माझ्या आईला म्हणालो, 'मला वधू शोध.'
सायरा कोण आहे?
स्लमडॉग मिलेनियर या चित्रपटासाठी ऑस्कर जिंकणारे संगीतकार ए आर रहमान हे भारतातील महान संगीतकार आहेत. मां तुझे सलाम, ओ हमदम सुनियो रे, तेरे बिना बेसवाडी रातियां सारखी अनेक हिट गाणी त्यांनी दिली आहेत. रहमानने 1989 मध्ये इस्लाम धर्म स्वीकारला. त्यांनी दिलीप कुमार या नावावरून अल्लाह राखा रहमान असं नाव बदललं. रेहमानची पत्नी सायरा बानो या अभिनेता रशीन रहमानच्या नातेवाईक आहेत.