दु:खद बातमी : प्रसिद्ध गायक, संगीतकार ए. आर. रहमान यांच्या आईचं निधन
प्रसिद्ध गायक आणि संगीतकार ए. आर. रहमान यांची आई करीना बेगम यांचं
मुंबई : प्रसिद्ध गायक आणि संगीतकार ए. आर. रहमान यांची आई करीना बेगम यांचं निधन झालं आहे. सोमवारी चेन्नईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. स्वत: ए आर रहमान यांनी ट्विटरवर आईचा फोटो पोस्ट करत निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिलाय. गायिका श्रेया घोषाल, दिग्दर्शक शेखर कपूर आदी कलाकारांनीही सोशल मीडियाद्वारे शोक व्यक्त केलाय.
रहमान यांनी सोशल मीडियावर आईचा फोटो शेअर करुन त्यांना श्रद्धांजली दिली. वडील आणि संगीतकार आर. के. शेखर यांच्या निधनानंतर आई करीमा यांनीच ए आर रहमान यांचं संगोपन केलं.
वडिलांच्या निधनाच्या वेळी ए आर रहमान फक्त नऊ वर्षांचे होते. वडिलांच्या निधनानंतर ए.आर. रहमान यांच्या कुटुंबाची परिस्थितीच बदलली. त्यावेळी आपल्या वडिलांची वाद्ये भाड्याने देऊन त्यांनी कुटुंबाचा गाडा चालवला. आपल्यातील संगीताची आवड आणि जाण आईनेच ओळखली, असं ए.आर. रहमान यांनी अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं होतं.