Arbaaz Khan : 56 वर्षीय अरबाज खान त्याच्या दुसऱ्या विवाहानंतर खूप आनंदी आहे. 24 डिसेंबर रोजी अरबाजचा विवाह मेकअप आर्टिस्ट शूरा खानसोबत झाला होता. आता हे जोडपे हनिमूनला रवाना झाले आहे. अरबाज खान आणि शूरा खान मुंबई विमानतळावर एकत्र दिसले होते. दोघेही नवीन वर्षाची सुट्टी आणि हनीमूनला जाताना दिसले होते. मात्र आता अरबाज खानचा शूरा खानला प्रपोज करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अरबाज आणि मलायकाचा मुलगा देखील दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेता अरबाज खानने त्याची पहिली पत्नी मलायका अरोरासोबत घटस्फोटाच्या 6 वर्षांनंतर दुसरे लग्न केले आहे. अरबाजने 24 डिसेंबर 2023 रोजी एका खाजगी समारंभात मेकअप आर्टिस्ट शूरा खानशी विवाह केला. अरबाज आणि शूराचा एका छोट्याशा सोहळ्यात विवाह झाला. अर्पिता खानच्या मुंबईतील घरी हा सोहळा आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते. विवाहाच्या एका आठवड्यानंतर शूराने एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये अरबाज तिला प्रपोज करत आहे. या व्हिडिओमध्ये अरबाज शूराला गुडघ्यावर बसून प्रपोज करताना दिसत आहे.


विवाहाच्या अवघ्या 5 दिवस आधी अरबाजने शुराला प्रपोज केले होते, ज्याचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. अरबाजने अतिशय रोमँटिक पद्धतीने शूराला लग्नासाठी प्रपोज केले. व्हिडीओमध्ये तो गुडघ्यावर बसतो आणि शूराला फुलांचा गुच्छ देतो. यावेळी अरबाजचा 21 वर्षांचा मुलगा अरहान खान, बहीण अर्पिता खान, आयुष शर्मा आणि इतर मित्रही उपस्थित होते. तिला पुष्पगुच्छ देताना अरबाजने शूराला त्याच्याशी विवाह करण्यासाठी विचारत आहे. व्हिडिओमध्ये अर्पिता पुष्पगुच्छातून प्रपोजलची अंगठी शोधताना दिसत आहे. यानंतर अरबाजने शूराला अंगठी घातली. तेव्हा ती लाजते आणि दोघेही मिठी मारतात. यावेळी अर्पिता आणि आयुषसह अरहानने त्यांना चिअर केले.


शूराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याच्यासोबत '19 तारखेला हो म्हणण्यापासून ते 25 डिसेंबरला विवाह करण्यापर्यंत सगळं काही फार लवकर झालं,' असे शूराने कमेंटमध्ये लिहीलं आहे. तर कमेंट सेक्शनमध्ये अरबाजने, 'माझ्या गुडघ्यावर बसून मला खूप उंच वाटत होते,' असे म्हटलं आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by sshura Khan (@sshurakhan)


दरम्यान, शनिवारी अरबाज आणि शूरा मुंबई विमानतळावर एकत्र दिसले होते. दोघेही न्यू इयर सेलिब्रेशन आणि हनिमूनसाठी निघाले होते. अरबाज आणि शुरा यांची भेट पटना शुक्ला चित्रपटाच्या सेटवर झाली, जो अरबाजचाच चित्रपट आहे. शूरा पेशाने बॉलिवूडमधील मेकअप आर्टिस्ट आहे.