मुंबई : मलायका अरोरा आणि अरबाज खान ही जोडी आता एकत्र नाही. एक काळ असा होता की मलायका आणि अरबाजची जोडी इंडस्ट्रीतील सर्वात चर्चेत असलेल्या जोडींपैकी एक होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मलायका आणि अरबाज खान एका फोटोशूटदरम्यान भेटले होते. असे म्हटले जाते की ते पहिल्या नजरेतच एकमेकांच्या प्रेमात पडले होते. काही वर्षे डेटिंग केल्यानंतर 1998 मध्ये त्यांनी लग्न केले. या लग्नापासून मलायका आणि अरबाजला अरहान खान हा मुलगा झाला.


मलायका आणि अरबाज खान यांनी लग्नाच्या 19 वर्षानंतर घटस्फोट घेतला आणि त्यांच्या सर्व चाहत्यांना धक्का बसला. मात्र, आता मलायका आणि अरबाजशी संबंधित एक किस्सा समोर आला आहे.


खरंतर मलायका आणि अरबाज एका चॅट शोमध्ये होते. येथील होस्टने अरबाज खानला मलायकाबाबत प्रश्न विचारला. मलायका ग्लॅमरस आहे आणि अनेकदा शॉर्ट कपड्यांमध्ये दिसते, लोक विचारतात की, हे सर्व पाहून अरबाज खानला कधी राग येत नाही का?'


या प्रश्नाला उत्तर देताना अरबाज खान म्हणाला होता, 'यात वाईट समजण्यासारखे काय आहे? मलायकाला चांगलेच माहित आहे की तिने काय करावे आणि काय नाही.


त्याचवेळी मलायकाने असेही म्हटले होते की ती असे कोणतेही काम करत नाही ज्यामुळे लोकांना तिच्याकडे बोट दाखवण्याची संधी मिळेल.