मलायका- अर्जुनच्या लग्नाची Ex Husband अरबाजला खबर; ऐकून म्हणाला...
तुम्ही आता हा प्रश्न सुचवण्यासाठी इतका वेळ घेतला आहात, तर आता मीसुद्धा त्याचं उत्तर शोधण्यासाठी थोडा वेळ घेईनच.
मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) हिनं लग्नाच्या बऱ्याच वर्षांनंतर अभिनेता अरबाज खान याच्याशी असणारं नातं संपुष्टात आणलं. अभिनेता अर्जुन कपूर याच्याशी असणारं नातं आता मलायका अगदी खुलेपणाने स्वीकारु लागली. तिथे अरबाजनेही त्याच्या प्रेयसीसोबतच्या नात्यावर शिक्कामोर्तब केला.
अरबाज आणि मलायका सध्या त्यांच्या आयुष्यात बरेच पुढे आले आहेत. इतके, की एका मुलाखतीदरम्यान अरबाजला त्याच्या Ex wife आणि तिच्या प्रियकरासोबतच्या नात्याबाबत विचारलं गेलं तेव्हा त्यानं लक्ष वेधणारं उत्तर दिलं.
सध्या मलायका आणि अर्जुनच्या (Malaika Arjun Wedding) लग्नाची बरीच चर्चा सुरु आहे. अशातच अरबाजला जेव्हा त्यांच्या नात्याबद्दल प्रश्न विचारला गेला.
ज्याचं उत्तर देत तो उपरोधिक सुरात म्हणाला, 'पाजी, फारच चतुराईने तुम्ही प्रश्न विचारला. फारच मेहनत करावी लागली असेल तुम्हाला. मला खरंच तुमच्या या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे.
तुम्ही आता हा प्रश्न सुचवण्यासाठी इतका वेळ घेतला आहात, तर आता मीसुद्धा त्याचं उत्तर शोधण्यासाठी थोडा वेळ घेईनच. उद्या उत्तर दिलं तर चालेल का?'
मलायका आणि अर्जुनने अजूनही त्यांच्या नात्याला लग्नापर्यंत आणण्याचा कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. ज्यामुळे त्यांचं नातं आता या टप्प्यावर केव्हा येणार हाच प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात आहे.