Arbaaz Khan-Shura Khan wedding:  बॉलिवूड अभिनेता आणि सलमान खान याचा भाऊ अरबाज खान (Arbaaz Khan) दुसऱ्यांदा बोहल्यावर चढला आहे. अरबाज खान  शूरा खान विवाह बंधनात अडकले आहेत. यांच्या लग्नाचा पहिला फोटो व्हायरल झाला आहे. अरबाज खान याने शूरा खानसोबत आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अरबाज आणि शूरचा लग्न सोहळा अभिनेत्याची बहीण अर्पिताच्या घरी संपन्न झाला. संपूर्ण खान कुटुंब आणि अरबाजचा मुलगा अरहानही या विवाहासाठी हजर होता. संपूर्ण खान कुटुंब आणि अरबाजचा मुलगा अरहानही या विवाहासाठी हजर होते. 


56 वर्षीय अरबाज पुन्हा एकदा नवरदेव बनला आहे. शूरा खान ही रवीना टंडन आणि तिची मुलगी रशा थडानी यांची व्यावसायिक मेकअप आर्टिस्ट आहे. जेव्हा अरबाज खान जॉर्जियासोबत रिलेशनशीपमध्ये होता, तेव्हा शूरा आणि अरबाज यांच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र, दोघं डेट करत असल्याची माहिती कोणालाही नव्हती. काही दिवसांपूर्वीच अरबाज याने आपल्या रिलेशनशिप बद्दल महिती देत लवकरच लग्न करणार असल्याची घोषणा केली होती.


अरबाज खान आणि मलायका अरोरा यांनी 1998 मध्ये लग्न केलं होतं. लग्नाच्या 19 वर्षांनंतर मलायका आणि अरबाज यांचा अधिकृत घटस्फोट झाला. दोघांनाही एक मुलगा असून नाव अरहान खान असं त्याचं नाव आहे.