Arbaaz Khan-Salman Khan : बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खानचं आपल्या भावांसोबत कसं नातं आहे हे सगळ्यांना काही प्रमाणात माहित आहे. अरबाजनं त्याचा मुलगा अरहान खानसोबतच्या एका पॉडकास्टमध्ये त्याच्या भावनांविषयी खुलासा केला आहे. त्याशिवाय त्यानं या देखीलही खुलासा केला आहे की कठीण काळात ते कसे एकमेकांच्या पाठीशी उभे राहतात. त्यात सोहेलनं देखील सलमानचे कौतुक केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी बोलताना अरबाजनं हे देखील सांगितलं की ते भावंड रोज एकमेकांशी बोलत नाहीत, मात्र काही अडचणी आल्या की एकमेकांच्या पाठीशी उभे राहतात. अरबाज याविषयी बोलताना म्हणाला की "आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आहोत. जेव्हा आम्ही लहान होतो. तेव्हा आम्ही एकत्र राहायचो पण जेव्हा आम्ही मोठे झाले आपापल्या कामाला लागलो आणि घरातून बाहेर पडलो... त्यापैकी एकाचे (सलमानचे) अजूनही लग्न झालेले नाही, पण आम्ही मात्र लग्न करून वेगळे झालो आणि पुन्हा लग्न देखील केले, पण आम्हा भावांमध्ये काहीही बदल झाले नाही."


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


अरबाज पुढं सांगितलं की, "असं आहे की जेव्हा आपण आपापल्या कामात व्यस्त असतो, तेव्हा एकमेकांसोबत वेळ घालवायला आपण नसतो, पण जेव्हा कोणावर अडचण येते तेव्हा आपण एकत्र असतो. अशा वेळी कोणीही एकमेकांपासून दूर जात नाही. आमचं जास्त भेटनं किंवा बोलणं होणार नाही पण, जर त्याला कळलं की मी कोणत्यातरी संकटात अडकलो आहे तेव्हा तो माझी मदत करण्यासाठी कधीच मागेपुढे पाहणार नाही."


अरबाजनं आपण एकमेकांच्या पाठीशी राहणं किती महत्त्वाचं आहे याविषयी सांगितलं आहे. अरबाज म्हणाला, ही मदत म्हणजे नेहमीच आर्थिक मदत नसते. मी सलमानला आर्थिक मदत करू शकत नाही कारण त्याच्याकडे खूप आहे, पण नेहमीच असं नसतं, अनेकवेळा तुम्हाला भावनिक आधाराची गरज असते. त्यावेळी तुम्हाला कोणीतरी ऐकणारा व्यक्ती त्यावेळी हवा असतो, कधीकधी आपण फक्त तिथे उपस्थित असणे पुरेसे असते."


हेही वाचा : पहिल्या प्रेमात मिळाला धोका..., नंतर करोडपती निर्मात्याशी केलं विद्या बाललनं लग्न


सलमान, अरबाज आणि सोहेल हे लेखक सलीम खान आणि त्यांची पहिली पत्नी सलमा खान यांची मुलं आहेत. सलमान सगळ्यात मोठा आहे. सलमान हा सगळ्यांचा आवडता अभिनेका असून अरबाज हा अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता आहे. तर सोहेल अभिनेता, दिग्दर्शक आणि पटकथा लेखक आहे.