COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : आयपीएल सट्टेबाजीप्रकरणी अभिनेता सलमान खानचा भाऊ अभिनेता आणि दिग्दर्शक अरबाज वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. याप्रकरणी त्याला ठाणे खंडणीविरोधी पथकाने समन्स बजावले आहे. आयपीएल सट्टेबाजी प्रकरणात दोषी असलेल्यांना नुकतेच ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतलं. यावेळी आरोपींनी अरबाज खानचं नाव घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अरबाजन खान समोरच्या अडचणी वाढल्या आहेत. नुकत्याच संपलेल्या आयपीएल सीझन दरम्यान बुकी सोनू जालानच्या अटकेनंतर हा गौप्यस्फोट झालायं. अरबाज खान साधारण ३ कोटी रुपये सट्टेबाजीत हरल्याची चर्चा आहे. आयपीएल २०१६ च्या सीझनमधील २ मॅचमध्ये सावळा गोंधळ झाल्याचा पोलिसांना संशय आहे. व्यावसायिक हनीफ खान, बुकी सोनू आणि अरबाज खान यामध्ये मध्यस्थी असल्याचे कळते. 


कोण आहे सोनू ? 


सोनू मलाडने २०१६ मध्ये पाकिस्तानच्या वेटरन क्रिकेटर्सची स्थानिक मॅच फिक्स केली होती. ही मॅच फिक्स करण्यासाठी सोनूची मिटींग टीमचा मालक हनीफसोबत झाली. बॉलीवुडमधील मोठ्या अभिनेत्याने यांच्यात भेट घडवून आणली होती.  सोनू मलाडकडे या अभिनेत्याचा स्टिंग व्हिडिओदेखील असल्याचे कळते. याच आधारे तो या अभिनेत्याला ब्लॅकमेल करत आलायं.


कोण आहे हनीफ  ?


मुळचा पाकिस्तानी असलेला हनीफ मलिक ब्रिटीश व्यापारी असल्याचे सांगितले जाते. हनीफची मिटींग घडवून आणणारा अभिनेता मुंबईतील वांद्रे येथे राहत असल्याचे कळते.