मलायकासमोर अरबाज आपल्या गर्लफ्रेंडसोबत
काय आहे मलायकाची प्रतिक्रिया
मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदा देखील गणेश चतुर्थीचा हा सण सलमान खानच्या घरी कुटुंबियांनी अगदी उत्साहात साजरा केला. गेल्या 14 वर्षांपासून सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये गणरायाची प्रतिष्ठापना केली जाते. गेल्यावर्षापासून हा उत्सव अर्पिता खानच्या घरी साजरा केला जातो. यावर्षी देखील तिकडे अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली.
अर्पिताला गणेशोत्सव खूप आवडतो. त्यामुळे गेल्यावर्षीपासून हा उत्सव तिच्या घरी साजरा केला जातो. यंदा देखील सलमान खानच्या दोन्ही बहिणी अर्पिता आणि अलवीरा खानने मिळून या गणेशोत्सवाची तयारी केली. बाप्पाच्या आरतीच्या वेळी संपूर्ण कुटूंब एकत्र आलं होतं. अर्पिताच्या घरी मलायका अरोरो, सलीम खान, सलमान खान, हेलेन, सलमा खान, सोहेल खान, कतरिना कैफ, अमृता अरोरा, अरबाज खान आणि त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी होती. जॉर्जियासोबत तिचे वडिल देखील खान कुटुंबियांच्या भेटीसाठी गेले होते.
खूप दिवसांपासून अशी चर्चा होती की, जॉर्जियाचे वडिल गणेशोत्सवाच्या काळात खान कुटुंबियांशी अरबाज आणि जॉर्जियाच्या लग्नाची बोलणी करतील. आणि ही गोष्ट खरी ठरली यावेळी जॉर्जियाचे वडिल खान कुटुंबियांना भेटले. तसेच यावेळी अरबाजची पत्नी मलायका अरोरा देखील तिकडे होती. आपल्याला माहितच आहे मलायका आणि अरबाज यांनी घटस्फोट घेतला आहे.