खासदाराशीचं लग्न करणार म्हणणाऱ्या अभिनेत्रीचा Dating App विषयी मोठा खुलासा...
Archana Gautam: अर्चना गौतम यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या खासगी आयुष्याविषयी सांगत डेटिंग अॅपवर काय पाहून घाबरल्या हे देखील सांगितलं आहे.
Archana Gautam: राजकारणात सक्रिय असलेल्या अभिनेत्री अर्चना गौतम सध्या सोशल मीडियावर चांगल्याच चर्चेत आहेत. अर्चना गौतम यांना आपण सध्या 'खतरों के खिलाडी 13'मध्ये पाहू शकतोय. त्यात एका पेक्षा एक असे धोकादायक स्टंट करताना अर्चना गौतम दिसत आहेत. पण आता त्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत. अर्चना गौतम या 'बिग बॉस 16' मध्ये दिसल्या होत्या. त्यावेळी त्यांनी त्यांच्या लाईफ पार्टनवर वक्तव्य केलं होतं. त्यांच्या लाईफ पार्टनरमध्ये कोणते गुण असायला हवे याविषयी त्यांनी सांगितलं होतं. त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी सलमान खानला यावेळी सांगितलं होतं की त्या फक्त आणि फक्त एका खासदाराशी लग्न करणार. मात्र, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अर्चना गौतम यांनी त्यांच्या लव्ह लाईफविषयी बोलताना डेटिंग अॅपवर आलेल्या एका धक्कादायक अनुभवाविषयी सांगितले होते.
अर्चना यांनी ही मुलाखत 'ईटाइम्स' ला दिली होती. या मुलाखतीत अर्चना म्हणाल्या की 'प्रेमाविषयी बोलायचं झालं तर माझं अकाऊंट अजूनही शुन्यावरच आहे. गोल गोल डब्बा आहे. मला असं वाटतंय की माझ्या प्रेमाला ग्रहण लागलंय. सध्या मी प्रेमाच्या शोधात नाही. काही दिवसांपूर्वीच माझ्या एका मैत्रिणीनं मला एक डेटिंग अॅप डाऊनलोड करण्याचा सल्ला दिला. मी तिचं ऐकलं माझं अकाऊंट देखील बनवलं. अकाऊंट बनवल्यानंतर मला लगेचच अनेक मुलं आणि पुरुष दिसू लागले. मला नाही वाटतं की त्याला ऑपरेट किंवा मॅनेज करू शकेल. अजूनही तो अॅप माझ्या फोनमध्ये आहे. पण मी त्याला अनइन्स्टॉल करणार आहे. माझ्याकडून हे होत नाही. माझ्या मैत्रिणीनं सांगितलं की तिला तिथेच बॉयफ्रेंड मिळाला होता. पण माझ्याकडून ते होणार नाही.'
हेही वाचा : Urvashi Rautela ला लक्षात आली चूक! 'या' अभिनेत्याला म्हणालेली आंध्र प्रदेशचा CM
आता त्यांच्याकडे यासाठी वेळ नाही कारण त्यांना आपल्या कामावर लक्ष केंद्रित करायचं आहे. प्रेम प्रतिक्षा करू शकतो. त्या म्हणाल्या की 'आता माझं संपूर्ण लक्ष हे कामावर आहे आणि हे डेटिंग अॅप आणि मुलांवर मला माझं लक्ष केंद्रित करायचं नाही. प्रेम शोधण्याच्या प्रयत्नात मी कामावर असलेलं लक्ष घालवू शकत नाही. प्रेम नंतर होईल.