लाखो रूपये मिळवण्याऱ्या अर्चना पूरन सिंहच्या करियरची सुरूवात फक्त 100 रूपयांपासून
झगमगत्या विश्वात आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी अर्चनाने अनेक संकटांचा सामना केला
मुंबई : झगमगत्या विश्वात आपलं वर्चस्व गाजवण्यासाठी अनेक संकटांचा सामना करावा लागतो. या प्रवासात काहींना यश मिळतं, तर काहींना अपयशाचा सामना करावा लागतो. असचं काही झालयं अभिनेत्री अर्चना पूरन सोबत. अर्चनाने तिच्या अभिनयाची सुरूवात 'जलवा' सिनेमाच्या माध्यमातून केली. 'जलवा' सिनेमात तिच्यासोबत अभिनेता नसीरुद्दीन शाह यांनी मुख्य भुमिका साकारली होती. या सिनेमानंतर 'अग्निपथ', 'राजा हिंदुस्तानी', 'सौदागर' या सिनेमांमध्ये काम केलं.
बॉलिवडमध्ये अर्चनाला हवं तसं यश मिळालं नाही. तिने दिग्दर्शक करण जोहरच्या 'कुछ कुछ होता है' 'बोल बच्चन', 'मोहब्बतें', 'कृष' सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे. तर सिनेमांमध्ये काम करण्याआधी अर्चना ऍड फिल्ममध्ये काम करत होती. ज्यासाठी तिला फक्त 100 मिळत होते.
याचबद्दल अर्चनाने एक किस्सा सांगितला आहे. कपिल शर्मा शोमध्ये आलेल्या पाहुण्यांना त्यांच्या पहिल्या कमाईबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा शोमध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिंन्हा आणि बादशाह आले होते. त्यानंतर काही वेळाने हा प्रश्न अर्चनापर्यंत आला तेव्हा तिने स्वतःच्या पहिल्या कमाईबद्दल सांगितलं.
अर्चना म्हणाली, मला तर फक्त 100 रूपये मिळाले होते. अर्चनचं हे उत्तर ऐकून कपिल देखील हैरान झाला. पुढे अर्चना म्हणाली, 'मी एका ऍड फिल्ममध्ये ओमपुरींसोबत काम केलं होतं. तेव्हा फक्त एका बाजूला उभं राहण्याचा माझा रोल होता. पण त्यानंतर मी ओमपुरींसोबत मुख्य अभिनेत्री म्हणून काम केलं...' असं अर्चनाने सांगितलं.