मुंबई : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाच्या बातम्या सध्या सोशल मीडियावर चांगल्याच चर्चेत आहेत. या कपलला वधू-वर बनताना पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. जर तुम्ही विचार करत असाल की, हे कपल 17 एप्रिलला लग्न करणार आहे. तर हा व्हिडिओ पाहा मग तुम्हाला विश्वास बसेल की, दोघांचं लग्न झालं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलीकडेच नेटफ्लिक्सने आपल्या इंस्टाग्रामवर रणबीर आणि आलियाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये या कपलची  केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, आलिया वधूच्या वेशात खूपच सुंदर दिसत आहे. तर तिथे रणबीर आलियाला पाहून खूप खूश दिसत आहे.


नेटफ्लिक्सने हा व्हिडिओ शेअर केल्यापासून हा व्हिडिओ सोशल मीडियावर आगीसारखा व्हायरल होत आहे. मात्र आता तुम्हाला या व्हिडिओमागचं आम्ही सत्य सांगणार आहोत. आलिया आणि रणबीर कपूर यांचं अजून लग्न झालेलं नाही, हे दोन व्हिडिओ वेगवेगळ्या चित्रपटांचे आहेत. या व्हिडिओत आलियाचा सीन हम्प्टी शर्मा की दुल्हनिया मधील तर रणबीर कपूरचा सीन ये जवानी है दिवानी मधील आहे.



हा व्हिडीओ शेअर करत नेटफ्लिक्सने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, दोघंही खऱ्या आयुष्यात एका सुंदर कपलसारखे दिसणार आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते त्यांच्यावर भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. आणि या कपलला विचारतायेत की, मॅडमने खरोखर लग्न केलं आहे का?... तर काही युजर्स लिहित आहेत की, आलियाने खऱ्या लग्नातही अशीच एन्ट्री मारली पाहिजे.


व्हिडिओच्या शेवटी आलिया भट्ट किंग खानची सिग्नेचर स्टेप करताना दिसत आहे. आणि ती रणबीरला सांगत आहे की, मी केव्हापासून तुझी वाट पाहतेय... आता प्रेक्षकांचीही प्रतीक्षा संपणार आहे. केवळ प्रेक्षकच नाही तर संपूर्ण बॉलिवूड आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नाची वाट पाहत आहेत.