मुंबई : वरील फोटोत दिसत असणाऱ्या या महिलेला तुम्ही ओळखू शकता का? जर तुम्ही ओळखलंत, तर तुम्ही बॉलीवूडचे खरे आणि कट्टर चाहते आहात आणि नसल्यास आम्ही तुम्हाला एक सूचना देऊ. ही पिझ्झा खाणारी एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री असून तिने एका हॉरर चित्रपटातही काम केलं आहे. तिचा परफॉर्मन्स पाहून लाखो लोकांची मनं हरपतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही अभिनेत्री कोण आहे
फोटोतील स्त्री ओळखू शकता का? नसेल तर मनावर जरा जास्त जोर द्या. चला तुमच्या संयमाची मर्यादा न तोडता, विचित्र दिसणारी स्त्री कोण आहे हे आम्ही तुम्हाला सांगतो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ती दुसरी तिसरी कोणी नसून बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा आहे.


बालपणीच भविष्य ठरवलं होतं
आदा तमिळ पलक्कड अय्यर कुटुंबातील असून ती मुंबईत लहानाची मोठी झाली आहे. तिने दहावीतच ठरवलं होतं की, तिला अभिनेत्री व्हायचयं. जेव्हा अदा चित्रपटसृष्टीत प्रवेशासाठी ऑडिशन देत होती तेव्हा तिला नकार मिळत होते. याचं कारण तिचे कुरळे केस होते किंवा निर्मात्यांना वाटत होतं की, ती खूप लहान आहे. अदा शर्मा तिच्या फोटोशूटमुळे चर्चेत असते. बॉलिवूड चित्रपटांशिवाय ती साऊथच्या चित्रपटांमध्येही काम करत आहे.


अभिनेत्री अदा शर्माने 1920 या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ती खूप सुंदर आहे पण तिच्या लूकवर खूप प्रयोग करत असते. अदा शर्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि ती तिचे सुंदर फोटो शेअर करत असते. अदा शर्मा फारश्या चित्रपटांमध्ये दिसली नाही, पण तिची '1920' चित्रपटाची प्रतिमा लोकांच्या मनात घर करून आहे. '1920' व्यतिरिक्त अदा शर्मा 'हसी तो फसी', 'कमांडो 2' आणि 'कमांडो 3' सारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे.