मुंबई : गायक अरिजीत सिंह त्याच्या गोड आवाजामुळे रसिक प्रेक्षकांचा फेवरेट सिंगर बनलाये, त्याची प्रत्येक गाणी ही सुपरहिट ठरली आहेत. पण एक व्यक्ती असा आहे ज्याला अरिजीत सिंहचा आवाज अजिबात आवडत नाही, हा व्यक्ती दुसरा तिसरा कुणी नसून सुपरस्टार सलमान खान आहे.अरिजीत सिंह बॉलिवूडमधील एक जबरदस्त गायक आहे, तर सलमान खान बॉलिवूडचा भाईजान आहे. दोघेही आपआपल्या क्षेत्रात आपलं वेगळं स्थान निर्माण  करण्यात यशस्वी झाले आहेत. पण या दोघांमधील दुरावा अजून ही कायम आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अरिजीत सिंहने आतापर्यंत अनेक बॉलिवूड सिनेमांसाठी एकापेक्षा एक अशी हिट गाणी दिली आहेत. यासाठी त्याला अनेक अवॉर्ड मिळाले आहेत. पण एका अवॉर्ड  दरम्यान भाईजान सलमानसोबत पंगा घेणं अरिजीतला चांगलंच महागात पडलं आहे. त्याच झालं असं की, एका अवॉर्ड फक्शनमध्ये सलमानच्या हस्ते अरिजीत सिंहला अवॉर्ड देण्यात येणार होता.


यावेळी अरिजीतने कॅज्यूअल शर्ट आणि चप्पल घालून सोहळ्याला हजेरी लावली होती. आणि अरिजीत सिंहचे नाव घेण्यात आल्यावर हा  अवॉर्ड घेण्यासाठी त्याला काहीसा उशीर देखील झाला. 


यावरुन सलमान काहीसा नाराज झाला होता. कॅज्यूअल कपड्यांमध्ये स्टेजवर आलेल्या अरिजीतला सलमानने विचारलं , "झोपला होतास का ? यावर अरिजीतने उत्तर देत म्हटलं,  "तुम्हा लोकांमुळे मी झोपलो होतो" अरिजीतच्या या उत्तराचा सलमानला राग आला. यानंतर अरिजीतने सलमानची अनेकदा माफी देखील मागितली.पण दोघांमधील अबोला अद्याप कायम आहे.



बोलंल जातं की,  सलमानने आपल्या सिनेमातील काही गाण्यासाठी अरिजीत सिंहला साईन केलं होतं, पण हा किस्सा घडल्यानंतर सलमानने अरिजीतला दिलेली गाणी  काढून घेत, साईन केलेले कॉन्ट्रॅक्टर रिजेक्ट केले.


अरिजीत सिंहचं पहिलं गाणं 2011 मध्ये रिलीज झालं होतं.'मर्डर 2' या सिनेमातील 'फिर मोहब्बत करने चला है तू' हे गाणं त्यानं गायलं होतं, हे गाणं खूपच गाजलं.  त्यानंतर 2005 मध्ये अरिजीत सिंह घरघरात पोहोचला आणि त्यांची टॉप -5 गायकांच्या यादीत वर्णी लागली.