मुंबई : अभिनेता अर्जुन बिजलानी (Arjun Bijlani) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. अर्जुन हा वेगवेगळ्या प्रकारच्या रिअॅलिटी शो आणि मालिकांचा एक भाग होता. दरम्यान, एक काळ असा होता जेव्हा त्यानं स्वतःवरचा आत्मविश्वास गमावला होता. काम आणि पैशांच्या अभावामुळे तो इतका अस्वस्थ झाला की त्याने आपल्या पहिल्या मुलाचा गर्भपात करण्याचा निर्णय घेतला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्जुन बिजलानीनं स्टार प्लस शो स्मार्ट जोडीमध्ये पत्नी नेहा स्वामीच्या उपस्थितीत या विषयी सांगितलं की, नेहा प्रेग्नंट असल्याचे समजल्यानंतर तो आर्थिकदृष्ट्या संघर्ष करत होता. मग त्यानं आपल्या पत्नीसोबत ठरवले की आपण आपल्या पहिल्या मुलाला जगात आणायचे नाही. अर्जुनने सांगितले की, 'आमच्या लग्नाला फक्त एक वर्ष झालं होतं आणि आम्हाला कळलं की नेहा गरोदर आहे आणि ती दीड वर्षांपासून काम करत नव्हती.' अर्जुन म्हणाला, आम्हाला हे कळलं की मुलांची मोठी जबाबदारी असते, त्यामुळे आम्हाला ही गोष्ट पुढे न्यावीशी वाटली नाही. नेहा रडली पण तिनंही होकार दिला. शेवटी मी विचार केला कारण माझ्या खात्यात फक्त 40-50 हजार रुपये शिल्लक होते. (arjun bijlani struggled financially wanted to abort first child) 



दरम्यान, अर्जुन बिजलानी आणि नेहानं दीर्घकाळ डेटिंग केल्यानंतर 2013 मध्ये लग्न केलं. 2015 नेहानं तिच्या पहिल्या बाळाला जन्म दिला. अर्जुनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, अर्जुननं 'परेदस में मिला कोई अपना', 'आशिकी', 'मिली जब हम तुम', 'लेफ्ट राइट, 'नागिन', 'तेरी मेरी लव्ह स्टारी', 'काली' यासारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. आज अर्जुन बिजलानी अनेक रिअॅलिटी शोमध्ये सुत्रसंचालकाची भूमिका साकारतो.