मुंबई : अभिनेता  अर्जुन कपूर त्याचा चित्रपटांमुळे आणि अभिनेत्री मलायका अरोरासोबत असलेल्या नात्यामुळे कायम चर्चेत असतो. पण आता अर्जुन एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. अर्जुन आता अभिनेत्री रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) सोबत रोमांस करताना दिसणार आहे. रकुल अर्जुन एका ट्रॅकच्या माध्यमातून एकत्र येणार आहेत. पण अद्याप त्यांच्या आगामी ट्रॅकच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही. अर्जुनने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्जुनने शेअर केलेल्या फोटोमध्ये दोघांचे हात दिसत असून फोटोमध्ये 'चांगलं, वाईट, सुंदर' असं  लिहिलं आहे. तर अर्जुनने कॅप्शनमध्ये, 'रकुल आणि एक  गाण्याच्या माध्यमातून सर्वांच्या भेटीला येत आहे.' असं लिहिलं आहे. शिवाय दर्शन रावल, तनिष्क बागची, भूषण कुमार, शब्बीर अहमद, विनय सप्रू आणि राधिका राव यांना देखील टॅग केलं आहे. 



अर्जुन नुकताच अभिनेत्री परिणीती चोप्रासोबत 'संदीप ऐर पिंकी फनार' चित्रपटात एकत्र झळकले होते. आता अर्जुनचे आगामी ‘सरदार का पोता’, ‘भूत पुलीस’ और ‘एक खलनायक रिटर्न’चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहेत