`पॉझिटिव्ह राहण्याचा अर्थ असा नाही की, ...` मलायकासोबतच्या ब्रेकअपनंतर अर्जुन कपूरची पोस्ट
अर्जुन कपूरबद्दल बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. याला कारण मलायकासोबतचं ब्रेकअप. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. अर्जुन कपूरने सोशल मीडियावर पोस्टमधून त्याने सकारात्मक यावर एक पोस्ट केली आहे.
सध्या हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक त्यांच्या लग्नाच्या ब्रेकअपमुळे चर्चेत आहेत. याशिवाय, बी-टाऊनमध्ये आणखी एक जोडपे आहे ज्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या अनेक महिन्यांपासून सोशल मीडियावर चर्चेचा विषय होता. तो म्हणजे अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्याबद्दल.
2017 मध्ये अरबाज खानपासून घटस्फोट झाल्यापासून, मलायका अरोरा तिच्यापेक्षा 12 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेता अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. अर्जुन आणि मलायका यांनी 2018 मध्ये डेट करण्यास सुरुवात केली आणि तेव्हापासून त्यांनी अतिशय मोकळेपणाचे आपल्या प्रेमाचा स्वीकार केला. एवढंच नव्हे तर जेव्हा मलायकाला ट्रोलिंग केले गेले तेव्हा अर्जून कपूरने सडेतोड उत्तर दिले आणि जेव्हा ब्रेकअपची बातमी आली तेव्हा दोघांनीही ती फेटाळली.
ब्रेकअपवर मलायका-अर्जुनचं मौन?
मात्र गेल्या काही महिन्यांपासून अर्जुन आणि मलायकाने त्यांच्या ब्रेकअपच्या अफवांवर मौन बाळगले आहे. इतकेच नाही तर दोघेही सोशल मीडियावर गूढ पोस्ट करून ब्रेकअपच्या अफवांना आणखी खतपाणी घालत आहेत. पुन्हा एकदा अर्जुनने आपल्या पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांची चिंता वाढवली आहे. ते म्हणाले की, सकारात्मक असण्याचा अर्थ असा नाही की सर्व काही ठीक होईल.
सकारात्मकतेवर अर्जुन कपूरची पोस्ट
सिंघम अगेनमध्ये खलनायक बनण्याच्या तयारीत असलेल्या अर्जुन कपूरने 19 जुलै रोजी इन्स्टाग्राम स्टोरीवर एक कोट शेअर केला होता. ज्यामध्ये असे लिहिले आहे की, "सकारात्मक राहण्याचा अर्थ असा नाही की, सर्व काही ठीक आहे. अभिनेत्याची ही पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमधून अर्जूनने आपली मनाची अवस्था व्यक्त केली आहे का? असा प्रश्न सगळ्यांना पडत आहे.
मलायका व्हॅकेशनवर
मलायका अरोराने अर्जुन कपूरच्या वाढदिवसाची कोणतीही पोस्ट शेअर केली नसल्याची माहिती आहे. सध्या अभिनेत्री स्पेनमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत आहे. स्पेनमधील तिचे बोल्ड फोटो ती सतत शेअर करत असते. एवढंच नव्हे तर एका मिस्ट्री मॅनसोबतही खास पोस्ट शेअर केली आहे.
अर्जुनच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तो रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम अगेन' या चित्रपटात अक्षय कुमार आणि अजय देवगणसोबत पडद्यावर दिसणार आहे. हा चित्रपट 1 नोव्हेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. तर नात्याबद्दल बोलायचं झालं तर मलायका आणि अर्जुन कपूर एकत्र नसल्याचे स्पष्ट होत आहे.