बाप्पाची आरास तुमच्या आहे खास, बघा झी 24 तासवर

गणपतीचे 10-11 दिवस कसे जातात अजिबात कळत नाही. घरतला प्रत्येक जण बाप्पाची सेवा करण्यात मग्न असतो. त्यामुळे बाप्पाही खुशीत असतो. 

Sep 15, 2024, 16:27 PM IST
1/8

1. माधुरी डांगे, खारघर नवी मुंबई

यांनी सुंदर अशा चाळीचा देखावा तयार केला आहे. पूर्ण चाळ गणपती बप्पाच्या येण्याने सजली आहे. 

2/8

2. प्रल्हाद सुतार, उल्हासनगर

सुतार कुटुंबाने गणेशाची आरास म्हणून सप्तश्रृंगी गडाची हुबेहुब प्रतिकृती तयार केली आहेत. यात त्यांनी गडाचे आणि मंदिराचे सगळे बारकावे टिपले आहेत. 

3/8

3. अरुण पालटे, दापोली

दापोलीच्या पालटे परिवाराने आजवर होऊन गेलेले संत आणि त्यांचे माहात्म्य सगळ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी वेगवेगळ्या प्रसंगांचा आकर्षक असा देखावा तयार केला आहे. 

4/8

4. कोमल अग्रवाल, वाकड, पुणे

कोमल अग्रवाल यांनी आपल्या घरच्या गणपतीची आरास म्हणून यावेळी भारताला मिळालेल्या वर्ल्ड कपचा देखावा तयार केला आहे. 

5/8

5. किरण घम, पुणे

पुण्यातील घम परिवारे आपल्या बाप्पाला फुलांच्या सुंदर अशा गार्डनमध्ये बसवले आहे. ही आरास त्यांनी पर्यावरणपूरक साहित्य वापरून केली आहे. 

6/8

6. अर्चित पाटील, नाशिक

नाशिकच्या अर्चित पाटील यांनी आपल्या गणपतीच्या देखाव्यासाठी रायपूरचे शेखरू पार्क बनवले आहे. त्यातून त्यांनी शेखरू प्राण्याची माहिती देऊन त्याच्या संवर्धनाचा संदेश दिला आहे. 

7/8

7. कुणाल गायकवाड, सांगली

यांनी आपल्या बाप्पाची मूर्ती मातीची आणली आहे आणि टाकाऊपासून टिकाऊ अशी पर्यावरणपूरक आरास तयार करून एक छोटे गाव साकारले आहेत. 

8/8

8. जयवंत खाकर, शहापूर

खाकर कुटुंबियांनी बाप्पाची आरास म्हणून झाड आणि त्याच्या पारंब्या तयार केल्या आहेत. त्याला पूरक अशी छान लायटिंगही केली आहे.