`वरुण धवनमुळे मला काम मिळत नाही,` अर्जून कपूर अखेर स्पष्टच बोलला, म्हणाला `त्याने करण जोहरला माझी...`
नुकत्याच दिलेल्य एका मुलाखतीत अर्जून कपूरने (Arjun Kapoor) वरुण धवनसह (Varun Dhawan) तयार केलेल्या एका शॉर्ट फिल्मसंबंधी सांगितलं.
बालपणीचे मित्र असल्याने अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि वरुण धवन (Varun Dhawan) यांचं नातं घट्ट असून, एकमेकांची जिगरी आहेत. दोघांनीही एकत्रच बॅरी जॉन्स इन्स्टिट्यूटमध्ये सौरभ सचदेवा यांच्याकडे अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं आहे. दरम्यान Galatta India ला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत, अर्जुनने त्या काळात वरुणसोबत बनवलेल्या एका शॉर्ट फिल्मबद्दल खुलासा केला. त्यात आपण केलेल्या कामाचा फारसा अभिमान वाटत नाही असंही त्याने कबूल केलं. आपल्या करिअरच्या एका टप्प्यावर करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनमधून ‘कमी काम’ मिळण्यामागे हे कारणदेखील असू शकतं असंही त्याने उपहासात्मकपणे म्हटलं आहे.
मुलाखतीदरम्या अर्जुनला विचारण्यात आलं की, तो आणि वरुण एकत्र प्रोडक्शन हाऊस सुरू करण्याचा विचार करत होते. त्यावर त्याने उत्तर दिलं की, “वरुणने मुळात मला मूर्ख बनवले. सात मिनिटांच्या शॉर्टफिल्ममध्ये माझी चांगली भूमिका असल्याचं त्यांनी सांगितलं. आम्ही त्यावेळी बॅरी जॉनकडून अभिनय शिकत होतो. त्याने ठरवले की आपल्याला अंतिम चित्रपटाचे दिग्दर्शन करायचं आहे. माझं असं होतं की, 'ठीक आहे, तो किती वाईट करेल'?" तो पुढे म्हणाला, “त्याने चित्रपट लिहिला आणि म्हणाला, ‘तू त्याचा हिरो आहेस’. आम्ही शूटिंग सुरू केलं आणि वरुण दिग्दर्शन करत होता. जेव्हा मी एडिट पाहिलं तेव्हा मला कळलं की खरंतर तो नायक होता आणि मी खलनायक होतो. त्याने मला हे सर्व सांगितलं नाही आणि शूटिंग पूर्ण केल्यानंतर मला याची माहिती मिळाली”.
तो पुढे म्हणाला, “त्या चित्रपटातील त्याचे संवाद अगदी बरोबर आहेत, ‘वो दिखता है निर्दोष स्वामी टाइप का, पर है आहे हरामी टाइपका (तो निष्पाप दिसतो, पण धूर्त आहे)’. युट्यूबवर हा चित्रपट उपलब्ध आहे ज्यामध्ये वरुण टी-शर्ट घातलेला दिसतो. मी तुम्हाला नाव सांगत नाही कारण मला त्याचा फारसा अभिमान नाही”.
अर्जुनने असाही खुलासा केला की, वरुणने ती शॉर्ट फिल्म निर्माता करण जोहरला दाखवला. “त्याने करण जोहरला शॉर्ट फिल्म दाखवली. तुम्ही कल्पना करू शकता का? मला असं वाटते की मला यामुळेच एका क्षणी धर्माकडून कमी काम मिळाले, ” असं तो हसत म्हणाला.
कामाबद्दल बोलायचं गेल्यास अर्जुन कपूर शेवटचा रोहित शेट्टीच्या सिंघम अगेनमध्ये दिसला होता. अजय देवगण, दीपिका पदुकोण, अक्षय कुमार, रणवीर सिंग, करीना कपूर खान आणि टायगर श्रॉफ यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ॲक्शन थ्रिलरला बॉक्स ऑफिसवर यश मिळाले. रकुल प्रीत सिंग आणि भूमी पेडणेकर यांच्यासोबत 'तो मेरे पती की बीवी' या चित्रपटात दिसणार आहे.