रोमान्स करण्यासाठी लॉन्ग ड्राईव्हला जाण्याची इच्छा नाही - अर्जुन कपूर
मुंबईच्या ट्रॅफीकमध्ये लॉन्ग ड्राईव्ह रोमान्सच्या स्वप्नांचा चक्काचुर
मुंबई : मी विचार करत बसणार आणि ती कार चालवणार असेल तर रोमान्स मग रोमान्स कसा करायचा? असा सवाल अभिनेता अर्जुन कपूरला पडला आहे. '2 स्टेट्स', 'हाफ गर्लफ्रेंड', ' तेवर' 'की अॅण्ड का' यांसारख्या चित्रपटात रोमॅंटीक भूमिका निभावल्यावही त्याला हा प्रश्न पडला आहे हे विशेष.
मुंबईच्या ट्रॅफीकमध्ये लॉन्ग ड्राईव्ह रोमान्सच्या स्वप्नांचा चक्काचुर
अर्जुन कपूर हा खरे तर, लग्जरी कार्स आणि गाड्यांचा शौकीन. त्याला एसयूवी प्रचंड आवडतात. एका कार्यक्रमात अर्जुनला विचारण्यात आले की, रोमान्स करण्यासाठी तुला लॉन्ग ड्राईव्हला जायला अवडेल का? यावर काहीशा विचारी मुद्रेत अर्जुन म्हणाला, अजिबात नाही. कारण मी फार विचार करतो. मला विचार करायला आवडते. त्यामुळे गाडीत बसल्यावर मी विचार करणार आणि ती गाडी चालवणार. मग, रोमान्स कसा होणार? त्यामुळे रोमान्सची ही पद्धत काहीशी नकार सुचवावा अशीच आहे. त्यातही मुंबईसारख्या शहरात ट्रॅफीकमध्ये तर हा विचार मी मुळीच करू शकत नाही.
अर्जुन कार आणि बाईकचा फॅन
बॉलिवूडमधील अनेकांना माहिती आहे की, अर्जुनला बाईकचे किती वेड आहे. पण, अर्जुनला त्याही पेक्षा अधिक वेड हे कार चालवण्याचे आहे. त्यामुळे त्याला असा सवाल येणे स्वाभाविक आहे. दरम्यान, अर्जुनने संदीप और पिंकी फरार' चित्रपटाचे शुटींग नुकतेच पूर्ण केले आहे. पुढच्याच महिन्यात तो 'नमस्ते इग्लंड' चित्रपटाचे शूटींग सुरू करणार आहे.