मुंबई : काही दिवसांपूर्वी अभिनेत्री मलायका अरोराचा अपघात झाला. या अपघातात अभिनेत्री जखमी देखील झाली. मलायकाच्या अपघाताची बातमी कळताचं अभिनेता अर्जुन कपूर तिच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी मलायकाच्या घरी पोहोचला. अपघातानंतर मलायका सध्या आराम करत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मलायकाच्या कठीण प्रसंगी अर्जुन मात्र कायम तिच्या सोबत आहे. अर्जुन त्याच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळल काढत मलायकाला भेटण्यासाठी तिच्या घरी जातो. आता देखील अर्जुनला मलायकाच्या घराबाहेर स्पॉट करण्यात आलं. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


यावेळी अर्जुनसोबत अभिनेता संजय कपूर देखील कॅमेऱ्यात कैद झाले. सध्या अर्जुनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मलायका आणि अर्जुनच्या नात्याबद्दल प्रत्येकाला माहिती आहे. अनेकांनी त्यांच्या नात्याला विरोध केला. पण दोघांनी प्रत्येक गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. 


मलायकाच्या डोळ्याला दुखापत
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मलायकाच्या ड्रायव्हरचा ड्रायव्हिंग करताना तोल गेला आणि त्याची कार इतर तीन कारला धडकली. मलायकाच्या डोळ्याला दुखापत झाल्याचं वृत्त आहे. अपघातानंतर लगेचच तिला नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 


एका वृत्तानुसार, मलाइकाला मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी रुग्णालयात नेलं आहे. मलायकाच्या कारची ज्या इतर तीन गाड्यांशी टक्कर झाली आहे. त्या त्याच कार्यकर्त्यांच्या असल्याचंही वृत्त आहे जे राज ठाकरेंच्या सभेला पुण्याहून मुंबईला जात होते.