एक आयडिया आणि बनले 80000000000 रुपयांचे नेटवर्थ, फ्रूटी घराघरात पोहोचवणारी नादीया आहे तरी कोण?

| Nov 24, 2024, 14:20 PM IST
1/12

एक आयडिया आणि बनले 80000000000 रुपयांचे नेटवर्थ, फ्रूटी घराघरात पोहोचवणारी नादीया आहे तरी कोण?

Success Story nadia chauhan frooti Parle Agro Buisness Inspirational Story

Nadia Chauhan Frooti:फ्रूटी तुम्ही कधी ना कधी प्यायलाच असाल. मॅंगो फ्रूट, फ्रेश अॅण्ड ज्युसी किंवा आलिया भटची जाहिरातही तुम्हील पाहिली असाल. या कंपनीच्या यशामागे एका महिलेचा हात आहे. आपल्या कर्तृत्वाने आणि मेहनतीने या महिलेने आपल्या वडिलांची कंपनी हजारो कोटींच्या उलाढालीपर्यंत नेली. ती महिला कोण आहे? जाणून घेऊया.

2/12

17 व्या वर्षी कंपनीत रुजू

Success Story nadia chauhan frooti Parle Agro Buisness Inspirational Story

पार्ले ॲग्रोच्या यशात नादिया चौहान यांचा मोठा वाटा आहे. ही कंपनी 1984 मध्ये सुरू झाली. पूर्वी ही कंपनी फक्त फ्रूटीच्या व्यवसायावर अवलंबून होती. पण 2003 मध्ये नादियाने कंपनीत एन्ट्री केली. त्यावेळी तिचे वय अवघे 17 वर्षे इतके होते. नादिया पार्ले ॲग्रोमध्ये रुजू झाली आणि तिने स्वत:ची कल्पना आणि मेहनतीने या कंपनीला एक नवीन ओळख मिळवून दिली. त्यामुळे कंपनीचा प्रवास ₹300 कोटींवरून ₹8000 कोटींपर्यंत पोहोचला. 

3/12

1984 मध्ये फ्रूटी लॉन्च

Success Story nadia chauhan frooti Parle Agro Buisness Inspirational Story

फ्रूटी 1984 मध्ये लॉन्च करण्यात आली होती. लोकांना ते खूप आवडली. लोकांना फ्रूटीची चव खूपच आवडली. देशात टेट्रा पॅक विकणारी पार्ले ॲग्रो ही पहिली कंपनी होती. 2003 पर्यंत पार्ले ॲग्रो ही कंपनी 300 कोटी रुपयांची कंपनी बनली होती. 2003 मध्ये कंपनीचे चेअरमन प्रकाश जयंतीलाल चौहान यांची मुलगी नादिया चौहान हिने कंपनीच्या मार्केटिंगची जबाबदारी घेतली.

4/12

ब्रँडचा प्रवास 8000 कोटींपर्यंत

Success Story nadia chauhan frooti Parle Agro Buisness Inspirational Story

फ्रूटी पूर्वी फक्त मुलं आवडीने प्यायची पण नादियाने ती मोठ्या माणसांच्या हातातही फ्रूटी दिली. तिने आलिया भट्ट आणि राम चरण यांसारख्या बॉलीवूड आणि टॉलिवूडच्या बड्या स्टार्सकडून याचे प्रमोशन करुन घेतले. या जाहिरातीवर 300 कोटी रुपये खर्च करण्यात आले आणि 2000 कोटींहून अधिक कमाई झाली. 

5/12

फ्रूटी खूप प्रसिद्ध झाली

Success Story nadia chauhan frooti Parle Agro Buisness Inspirational Story

यानंतर फ्रूटी खूप प्रसिद्ध झाली आणि सर्व वयोगटातील लोकांना ती आवडू लागली. नादियाच्या मेहनतीमुळे, फ्रूटी कंपनीसाठी एक मोठा ब्रँड बनला, ज्याची किंमत आज ₹ 8000 कोटी  इतकी आहे.

6/12

स्वत:ची वेगळी ओळख

Success Story nadia chauhan frooti Parle Agro Buisness Inspirational Story

नादिया चौहानने मार्केटिंगची जबाबदारी स्वीकारताच, तिने फ्रूटीचे पॅकेजिंग बदलणयाचे पहिले काम केले. पूर्वी फ्रूटी हिरव्या पाकिटात यायची. तर आंब्याचा रंग पिवळा असायचा. 2004 मध्ये नादिया चौहानने आणखी एक मोठा निर्णय घेतला. त्यांनी फ्रूटी मिनी समोसा पॅक लॉन्च केला. त्याची किंमत फक्त अडीच रुपये इतकी होती. 

7/12

फ्रूटीच्या टेट्रा पॅकची मागणी

Success Story nadia chauhan frooti Parle Agro Buisness Inspirational Story

विशेषतः ग्रामीण भागात फ्रूटीच्या टेट्रा पॅकची मागणी प्रचंड वाढू लागली. त्यामुळे कंपनीच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली. पूर्वी फ्रूटी हे लहान मुलांचे पेय मानले जायचे पण नादिया चौहानने ते प्रत्येक वर्गासाठी पेय बनवले. त्याने शाहरुख खानपासून ते आलिया भट्ट आणि अल्लू अर्जुनपर्यंत सर्वांना ब्रँड ॲम्बेसेडर बनवले. या सर्वात कंपनीचा महसूल 95% पर्यंत वाढला.

8/12

भारतीय बाजारपेठेत नवी क्रांती

Success Story nadia chauhan frooti Parle Agro Buisness Inspirational Story

2005 मध्ये नादियाने Appy Fizz लाँच केले. हा प्रोडक्ट म्हणजे भारतातील पहिला सफरचंदाचा रस. त्यावेळी भारतात असा रस नव्हता. ॲपी फिझचे पॅकेजिंग, चव आणि जाहिरातीमुळे ते खूप लोकप्रिय झाले. या उत्पादनाला 99% मार्केट शेअर मिळाला आणि दरवर्षी 36% ची वाढ झाली.

9/12

कंपनीला एक नवीन ओळख

Success Story nadia chauhan frooti Parle Agro Buisness Inspirational Story

तरुणांमध्ये अॅपी फीज खूप प्रसिद्ध झाली. ज्यामुळे कंपनीला एक नवीन ओळख मिळाली. यामुळे पार्ले ॲग्रोला अधिक यश मिळाले आणि फ्रूटीवरील अवलंबित्व कमी झाले. नादियाची ही कल्पना खूप यशस्वी ठरली.

10/12

नादियाचे नवे विचार, नवा दृष्टीकोन

Success Story nadia chauhan frooti Parle Agro Buisness Inspirational Story

केवळ एका उत्पादनावर अवलंबून राहणे योग्य नाही हे नादियाच्या लक्षात आले होते. त्यामुळे तिने Baileys सारखी नवीन उत्पादने देखील लॉन्च केली. जी आज ₹ 1000 कोटी रुपयांची उलाढाल करत आहेत. 

11/12

यशाचे सिक्रेट

Success Story nadia chauhan frooti Parle Agro Buisness Inspirational Story

नादिया यांनी त्यांनी उत्पादनांची गुणवत्ता आणि पॅकेजिंगकडे लक्ष दिले. त्यांची ही विचारसरणी कंपनीसाठी खूप फायदेशीर ठरली आणि पार्ले ॲग्रोला एक मजबूत ओळख मिळाली.

12/12

पार्ले ॲग्रोला ₹20,000 कोटींची कंपनी बनवणार

Success Story nadia chauhan frooti Parle Agro Buisness Inspirational Story

नादियाचे पुढील लक्ष्य पार्ले ॲग्रोला ₹20,000 कोटींची कंपनी बनवणे आहे. ती नवीन उत्पादने आणि डिजिटल मार्केटिंगवर लक्ष केंद्रित करत आहे. पार्ले ॲग्रो हे केवळ भारतातच नव्हे तर जगभरात मोठे नाव बनले पाहिजे, असे नादिया यांचे स्वप्न आहे.मेहनत आणि विचाराने हे स्वप्न पूर्ण आपण लवकरच पूर्ण करु असा विश्वास त्यांना आहे.