Arjun Kapoor Troll over fake height : फूटबॉल स्टार डेविड बेकहॅम हा सध्या भारतात आहे. त्यानं भारत विरुद्ध न्यूझीलंडच्या सेमीफायनलमध्ये देखील हजेरी लावली होती. यानंतर तो सोनम कपूरच्या घरी आयोजित करण्यात आलेल्या पार्टीत सहभागी झाला होता. या पार्टीत काही बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावली होती. त्या सगळ्या कलाकारांनी सोशल मीडियावर डेविडसोबतचे फोटो शेअर केले. त्यात अभिनेता अर्जुन कपूरचं देखील नाव आहे. अर्जुनसोबत त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री मलायका अरोरा देखील दिसले. त्यांनी डेविड बेकहॅमसोबतचे फोटो त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले. दरम्यान, अर्जुनच्या उंचीवर त्याला ट्रोल करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका इन्स्टाग्राम अकाऊंटनं त्याच्या पेजवरून एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यानं तीन फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत अर्जुन आणि डेव्हिड बेकहॅम आहे. दुसऱ्या फोटोत डेव्हिड बेकहॅम आहे आणि त्याची उंची 183m आहे असं दाखवलं आहे तर दुसऱ्या फोटोत अर्जुन कपूर असून त्याची उंची 178m असल्याचे दाखवले आहे. खरंतर अर्जुन आणि डेव्हिड बेकहॅमच्या फोटोत अभिनेता उंच असल्याचे दिसते. त्यामुळे त्याला ट्रोल करत एका नेटकऱ्यानं पोस्ट शेअर करत उंची वाढवण्यासाठी 'टीप्स द्या असे म्हटलं.' त्यानंतर अनेकांनी त्यावर कमेंट करत अर्जुनला ट्रोल केले. एक नेटकरी म्हणाला, 'अर्जुन कपूर डेविड बेकहॅमपेक्षा उंच कसा दिसू शकतो?' दुसरा नेटकरी म्हणाला, 'बेकहॅमची उंची 183m आहे आणि अर्जुनची 178m मग तो त्याच्याहून उंच कसा दिसतोय.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'भाई बूट्स घालून उंच होतोय तो.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'पायाच्या बोटांवर उभा असेल.'



ट्रोलर्सला अर्जुन कपूरचे सडेतोड उत्तर


अशा काही कमेंट पाहिल्यानंतर अर्जुन कपूरनं या सगळ्या नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. अर्जुन कपूर म्हणाला, 'माझी खरी उंची ही 183m आहे. ज्याचा अर्थ 6 फूट पेक्षा जास्त आहे. त्यामुळे जे तुम्ही वाचता त्या सगळ्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका.' 


हेही वाचा : मी तुझ्यासाठीच जगते...; आराध्याच्या वाढदिवसानिमित्तानं ऐश्वर्या- अभिषेकची भावनिक पोस्ट


दरम्यान, लक्षवेधी गोष्ट म्हणजे अर्जुन कपूरनं 'कल हो न हो' या चित्रपटातून असिस्टंट दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्यानं 2012 मध्ये त्यानं परिणीति चोप्रासोबत 'इशकजादे' या चित्रपटात काम केले. या चित्रपटातून त्यानं बॉलिवूडमध्ये अभिनेता म्हणून पदार्पण केले. जवळपास 10 वर्षानंतर देखील अर्जुन कपूरनं खूप हिट चित्रपट दिलेले नाही. त्याचा '2 स्टेट्स' हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. मात्र, अर्जुन कपूर हा त्याच्या कामा पेक्षा त्याच्या खासगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत असतो.