Aaradhya Bachchan Birthday : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांची लेक आराध्या बच्चन ही लोकप्रिय स्टारकिड्सपैकी एक आहे. आराध्याचा आज 16 नोव्हेंबर रोजी वाढदिवस आहे. आज आराध्या ही 12 वर्षांची झाली आहे. तिच्या वाढदिवसानिमित्तानं अभिषेक आणि ऐश्वर्यानं खास पोसट शेअर केल्या आहेत. ऐश्वर्या आणि अभिषेकनं आराध्याचा लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. त्या दोघांनी शेअर केलेले हे पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
ऐश्वर्यानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ऐश्वर्यानं तिचा आराध्याच्या लहानपणीचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत आराध्यानं गुलाबी रंगाचा फ्रॉक परिधान केला आहे. तर ती आई ऐश्वर्यासोबत सेल्फी काढताना दिसते. हा फोटो शेअर करत ऐश्वर्यानं लिहिलं की 'मी तुझ्यावर खूप, बिनशर्त आणि सदैव प्रेम करते. माझी गोड परी आराध्या. तू माझ्या आयुष्यातील प्रेम आहेस… मी तुझ्यासाठी श्वास घेते… तू माझा आत्मा आहेस… नेहमी आनंदी राहा, तुझा 12 वा वाढदिवस सगळ्यात चांगला जावो. देव तुम्हाला सदैव आशीर्वाद देवो. तू माझ्या आयुष्यात असण्याबद्दल धन्यवाद...मी तुझ्यावर सर्वात जास्त प्रेम करते. तु सर्वोत्तम आहेस.'
ऐश्वर्याच्या पोस्टवर नेटकऱ्यानी कमेंट करत खूप शुभेच्छा दिल्या आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट करत म्हटले की 'तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मी तुझ्यावर खूप प्रेम करते.' दुसऱ्या नेटकऱ्यानं तर आफ्रिकेतून आराध्याला शुभेच्छा दिल्या आहेत. ऐश्वर्या विषयी बोलायचे झाले तर ती सतत आराध्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. आराध्या ही लोकप्रिय स्टारकिड्सपैकी एक आहे. आराध्या ही सोशल मीडियावर नसली तरी देखील तिच्या संबंधीत अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तिच्या शाळेतील तर अनेक कार्यक्रमांतील फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे आपण पाहतो.
हेही वाचा : 'आंबट खाण्याची इच्छा होतेय!' Bigg Boss मध्ये अंकिता लोखंडेनं केली प्रेग्नंसी टेस्ट
दुसरीकडे ऐश्वर्यानंतर अभिषेकनं देखील आराध्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. माझ्या छोट्या परिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! माझे तुझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम आहे. 20 एप्रिल 2007 रोजी अभिषेक आणि ऐश्वर्यानं लग्न केलं. 2011 मध्ये ऐश्वर्यानं आराध्याला जन्म दिला.