मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरसाठी आजचा दिवस अत्यंत खास आहे. कारण आज तिच्या पहिल्यावहिल्या सिनेमा धडकचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. पहिल्यांदा जान्हवी प्रेक्षकांसमोर आणि चाहत्यांसमोर अभिनेत्री म्हणून येणार आहे. करण जोहरची निर्मिती असलेल्या या सिनेमात जान्हवी आणि ईशान खट्टर रोमान्स करताना दिसतील. जान्हवीच्या आयुष्यातील या खास आणि महत्त्वाच्या दिवशी वडील बोनी कपूर, बहीण खुशी तिच्या सोबत असतीलच. पण सध्या लंडनमध्ये आपल्या आगामी सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असलेल्या अर्जुन कपूरने तिच्यासाठी एक भावूक संदेश दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्जुन कपूरने एक दोन नव्हे तर तीन ट्वीट करत जान्हवीसाठी संदेश लिहिला. त्यात तो म्हणतो, उद्यापासून तू प्रेक्षकांचा हिस्सा होशील कारण उद्या तुझ्या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. सर्वात आधी मी माफी मागतो की त्यावेळेस मी मुंबईत नाही. पण मी तुझ्याबरोबर नक्कीच आहे. 



दुसऱ्या ट्वीटमध्ये अर्जुनने लिहिले की, मी तुला सांगू इच्छितो की, जर तू पूर्ण मेहनत आणि जिद्दीने काम केलेस तर हे प्रोफेशन खूप छान आहे. दुसऱ्यांचा सल्ला ऐकून त्याची कदर कर. पण तू तुझ्या मार्गाने चाल. मला माहित आहे की, हे सोपे नाही पण या सगळ्यासाठी तू तयार आहेस.



शेवटच्या ट्वीटमध्ये त्याने जान्हवीला धडकसाठी शुभेच्छा देत म्हटले की, धडकसाठी ऑल द बेस्ट. मला खात्री आहे की, मी माझे मित्र करण जोहर आणि शशांक खेतान तुला छान रिप्रेंजट करतील.



धडक हा सिनेमा सुपरडुपर हिट मराठी सिनेमा सैराटचा रिमेक आहे. आज सकाळी ११ वाजता या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे.