मुबंई : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीचा अंदाज नेहमीच पसंत केला जातो. आता सनी लिओनीसोबत दिलजीत जोसांझनेही स्क्रिन शेअर केली आहे. सनी आणि दिलजीत या जबरदस्त जोडीचं 'अर्जुन पटियाला'तील 'क्रेजी हबीबी वर्सेज देसी मुंडा' नवं गाणं प्रदर्शित झालं आहे. इंटरनेटवर या गाण्याची चांगलीच धूम पाहायला मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'क्रेजी हबीबी वर्सेज देसी मुंडा' हे पार्टी सॉग्न आहे. 'अर्जुन पटियाला' या चित्रपटातील या गाण्यामध्ये दिलजीत आणि सनीशिवाय कॉमेडियन वरुण शर्माही थिरकताना दिसत आहे.


'अर्जुन पटियाला' चित्रपटातील प्रमुख भूमिका साकारणारा दिलजीत स्वत:ही एक प्रसिद्ध सिंगर आहे. 'क्रेजी हबीबी वर्सेज देसी मुंडा' हे गाणं पंजाबी सिंगर गुरु रंधावाने गायलं आहे. एवढंच नाही तर गुरु रंधवाने हे गाणं लिहिलंही आहे. इंटरनेटवर या गाण्याला चांगलीच पसंती मिळत असून गाण्याला 1 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. 


'बेबी डॉल' गाण्यानंतर आता 'क्रेजी हबीबी वर्सेज देसी मुंडा'मधून सनी पहिल्यांदाच आयटम सॉग्नमध्ये झळकली आहे. 



'अर्जुन पटियाला' चित्रपटात क्रिती सेनन, वरुण शर्मा आणि दिलजीत दोसांझ भूमिका साकारणार आहे. चित्रपटात क्रिती 'ऋतू' नावाच्या पत्रकाराच्या भूमिकेत दिसतेय. तर दिलजीत पोलिसाच्या भूमिकेत असून तो फिटनेस फ्रिक 'अर्जुन' हे पात्र साकारणार आहे. वरुण शर्मा 'ओनिडा' ही व्यक्तिरेखा साकारत आहे.


या कॉमेडी चित्रपटात अनेक व्हिलनही दाखवण्यात आले आहेत. त्यामुळे हा चित्रपट कॉमेडी, ड्रामा, रोमॅंटिक, अॅक्शन ड्रामाही आहे. रोहित जुगराज दिग्दर्शित 'अर्जुन पटियाला' येत्या २६ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.