Arjun Rampal Daughter Myra Rampal's First Ramp Walk : बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल (Arjun Rampal) हा आज एक Proud Father आहे असं म्हणायला हरकत नाही. अर्जुन रामपालनं 1998 साली सुपरमॉडल मेहर जेसियाशी लग्न केलं. 2019 साली मेहर आणि अर्जुन रामपाल विभक्त झाले. मात्र, त्यांना दोन मुली असून एकीचं नाव मायरा (Myra Rampal) आणि महिरा (Mahikaa Rampal) असं आहे. दरम्यान, मायरानं नुकतंच फॅशन इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं आहे. तिला रनवेवर पाहिल्यानंतर लगेच अर्जुन रामपालनं सोशल मीडियावर तिच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. (Arjun Rampal Daughter Myra Rampal)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्जुन रामपालनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. यावेळी अर्जुननं त्याची लेक मायराचा रॅम्पवॉक करतानाचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत 'आज माझ्या राजकुमारीनं तिचा पहिला रॅम्प वॉक केला आहे. ते सुद्धा Christian Dior साठी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं तिनं तिच्या हिंम्मतीवर केलं. ऑडिशन देण्यापासून फिटिंग्सपर्यंत सगळं तिनं केलं. सगळ्या कठीण स्पर्धांमधून सिलेक्शन झाल्यानंतर ती इथे पोहोचली आहे. तिनं आम्हाला सर्वांना गर्व होईल असं काम केलं आहे. तिच्यावर आम्हाला गर्व आहे. तिला खूप सक्सेस, प्रेम आणि आनंद मिळण्यासाठी शुभेच्छा देतो. मायरा तुला शुभेच्छा. तू एक स्टार आहेस', असं कॅप्शन त्यानं दिलं आहे. (Myra Rampal First Ramp Walk)



अर्जुन रामपालनं ही पोस्ट शेअर केल्यानंतर सेलिब्रिटी त्यावर कमेंट करत मायराला शुभेच्छा देत आहेत. अभिनेत्री प्रिता झिंटा कमेंट करत म्हणाली, 'मायरा तुला खूप खूप शुभेच्छा, तू इतक्या लवकर मोठी झालीस आणि ते पण इतकी सुंदर. देवाचा तुझ्यावर आशीर्वाद राहू देत.' अभिषेक बच्चन म्हणाला, 'वेल डन मायरा.' सुनील शेट्टीनं हार्ट आणि ब्लेसिंग असे इमोटिकॉन वापरले आहेत. 


हेही वाचा : VIRAL VIDEO : पापाराझींसमोर पोज देता देता Rekha यांचा गेला तोल


मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया (Gate Way Of India) येथे झालेल्या या शोमध्ये अभिनेत्री रेखा, अनुष्का शर्मा आणि विराट कोहली, करिश्मा कपूर, सोनम कपूर आहुजा, अनन्या पांडे, श्वेता बच्चन, नताशा पूनावाला, अर्जुन कपूर, ईशा अंबानी आणि मीरा राजपूत यांच्यासोबत अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. त्यांच्या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. इतंकच काय तर बॉलिवूडसोबत अनेक हॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावली होती.