नवी दिल्ली : बॉलीवूड ड्रग्ज प्रकरणात एनसीबीतर्फे बड्या स्टार्सची चौकशी सुरु आहे. अभिनेता अर्जुन रामपाल याची देखील चौकशी सुरु आहे. दरम्यान अर्जुन रामपाल देश सोडून गेल्याचे वृत्त समोर येतेय. एनसीबीने १६ डिसेंबरला उपस्थित राहण्यास सांगितलं पण अर्जुन चौकशीसाठी उपस्थित नव्हता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यायालयाच्या समन्सनंतर अर्जुन रामपाल एनसीबीसमोर उपस्थित राहू शकले नाहीत. आपल्या वकिलाच्या माध्यमातून त्याने २२ डिसेंबरपर्यंत वेळ मागितला होता. पण अर्जुन रामपाल सध्या काही कामासाठी लंडनमध्ये गेल्याचे वृत्त समोर येतेय. त्याच्या आगामी 'नेल पॉलिश' (Nail Polish) सिनेमाच्या प्रसिद्धीचे काम पाहणाऱ्या टीमने याबद्दल माहिती दिली. 


अर्जुन रामपालने शुक्रवारी मीडियाशी बोलणं देखील टाळलं होतं. अर्जुन रामपालचा नेल पॉलिश सिनेमा नव्या वर्षात ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. 



एनसीबीच्या चौकशीदरम्यान देश सोडून जाणारे अर्जुन रामपाल एकमेव नाहीत. याआधी अभिनेत्री सपना पब्बीला देखील नोटीस मिळाल्यानंतर ती लंडनमध्ये गेली होती. आपण एनसीबीला माहिती देऊन परदेशी गेल्याचे तिने स्पष्ट केलं होतं. 


दिग्दर्शक करण जोहर याला देखील एनसीबीने नोटीस पाठवलीय. करण जोहर, दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह, सपना पब्बी, अर्जुन रामपाल, त्याची प्रेससी गॅब्रिएला और गॅब्रिएलाच्या एनसीबीने नोटीस पाठवलीय.