Arjun Rampal On Divorce : बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल त्याच्या अभिनय कौशल्यासाठी ओळखला जातो. त्यासोबत तो त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. अर्जुननं पहिलं लग्न हे मॉडेल मेहर जेसियाशी केलं होतं. पण लग्नाच्या 20 वर्षानंतर त्या जोडप्यानं विभक्त होण्याचा निर्णय घेतला. मेहर आणि अर्जुनला दोन मुली आहेत. तर आता अर्जुन हा मॉडेल गॅब्रियालासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. इतकंच नाही तर तो तिच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये देखील राहतो. दरम्यान, अर्जुननं मेहरसोबतच्या घटस्फोटाच्या इतक्या वर्षांनंतर त्याला काय वाटलं त्याचं दु:ख सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्जुन रामपालनं द रणवीर शोमध्ये हजेरी लावली होती. तिथे अर्जुन त्याच्या खासगी आयुष्यावर मोकळेपणानं बोलत होता. अर्जुननं सांगितलं की त्यानं खूप लवकर लग्न केलं, जे त्यानं करायला नको होतं. याविषयी सविस्तर सांगत अर्जुन म्हणाला, 'नातं तुटण्यासाठी तुम्ही कोणा एकाला जबाबदार ठरवून शकत नाही. ज्या चुका झाल्या आहेत त्यांच्याविषयी विचार करणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही हे सगळं सोडून स्वत: विषयी विचार कराल, तेव्हा तुम्हाला तुमच्या चुका दिसून येतील. आपल्यासोबत दुसऱ्या व्यक्तीमध्ये काय कमी आहे हे देखील कळेल. पण या नात्यासाठी तुम्हालाच सगळं ठीक करावं लागेल.'


पुरुष मूर्ख असतात...


अर्जुन आणि मेहरनं 1998 मध्ये लग्न केलं. लवकर लग्न करण्याविषयी अर्जुन पुढे म्हणाला, लग्न करण्यासाठी 20-30 हे वय खूप कमी आहे. मी 24 व्या वर्षी लग्न केलं होतं जे खूप लवकर होतं. पुरुष हे महिलेच्या तुलनेत हळू-हळू मॅच्युअर होतात आणि हे सिद्ध झालं आहे की आम्ही पुरुष मूर्ख असतो. 


लग्न मोडण्यासाठी स्वत: ला ठरवलं जबाबदार


अर्जुननं त्याचं लग्न मोडण्यासाठी स्वत: ला जबाबदार ठरवलं आहे. त्यानं सांगितलं की 'मेहरसोबत घटस्फोट घेणं खूप कठीण होतं. त्याचा सगळ्यात जास्त परिणाम हा मुलांवर झाला. मेहर आणि अर्जुन यांना दोन मुली आहेत.'


हेही वाचा : Arijit Singh च्या आवाजाचा वापर करू शकणार नाही AI प्लॅटफॉर्म, बॉम्बे हाय कोर्टामुळे गायकानं घेतला सुटकेचा श्वास


अर्जुन त्याच्या मुलींसोबत अनेकदा सोशल मीडियावर फोटो शेअर करताना दिसतो. तर वयानं 14 वर्ष लहान असलेल्या मॉडेल गॅब्रियालासोबत अर्जुन रामपाल हा रिलेशनशिपमध्ये आहे. तर त्यांना दोन मुलं सुद्धा आहेत. तरी देखील त्यानं गॅब्रियालाशी लग्न केलं नाही. ते दोघे आजही लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहतात.