Money Heist च्या प्रोफेसरची भूमिका लागली बॉलिवूड अभिनेत्याच्या हाती
जगभरात `Money Heist`चे करोडो चाहते आहेत.
मुंबई : जगभरात 'Money Heist'चे करोडो चाहते आहेत. त्याचबरोबर भारतातही या मालिकेच्या चाहत्यांची कमी नाही. या सिरिजच्या प्रत्येक सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. चाहत्यांची ही क्रेझ पाहता आता त्याचं हिंदी रूपांतर प्रदर्शित करण्याची योजना आखण्यात आली आहे.
'थ्री मंकी' या नावाने हिंदी रूपांतर केलं जात आहे.
अब्बास-मस्तान या जोडीने दिग्दर्शित केलेल्या 'थ्री मंकी' या नावाने ही मालिका सुरू होणार आहे. या शोमध्ये प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल देखील दिसणार आहे. विशेष म्हणजे त्याने याचं शूटिंगही सुरू केलं आहे. खुद्द अभिनेत्याने त्याच्या चाहत्यांना ही माहिती दिली आहे.
अर्जुनने सेटवरील एक फोटो शेअर केला आहे
अर्जुनने नुकताच इंस्टाग्रामवर एक सेल्फी पोस्ट केला आहे. यासोबतच त्याने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, 'लाइट्स, कॅमेरा, अॅक्शन. पुन्हा एकदा सेटवर. एका नव्या प्रवासाला सुरुवात होते. वृत्तानुसार अर्जुन या मालिकेत प्रोफेसरच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र, सध्या तरी त्यांच्या भूमिकेबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
अर्जुन या प्रोजेक्टमुळे चर्चेत आहे
अर्जुनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, सध्या त्याच्याकडे अनेक चित्रपट रांगेत आहेत. लवकरच तो कंगना राणौतच्या 'धाकड' या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय तो 'द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव' आणि 'आँखे 2' मध्येही दिसणार आहे. त्याला पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.